Mumbai News :मुंबईतील बीकेसीच्या मध्यभागी असलेली तब्बल पाच एकर जमीन ज्याची किंमत काही कोटींमध्ये आहे, ती जमीन आता प्रत्यक्षात एमएमआरडीए (MMRDA) अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी एक प्रकारे खाजगी जमीन म्हणून रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला आहे. बीकेसीमधील या सिटी पार्कमध्ये सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. परिणामीयाप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यातयावी, अशी मागणीही आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Varun Sardesai on MMRDA : एमएमआरडीए आयुक्तांनी कोणत्या अधिकाराखाली या प्रवेश पूर्णपणे बंद केला?
दरम्यान, करदात्यांच्या पैशातून जी विकासकामं केली त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत नसेल आणि फक्त एमएमआरडीए अधिकाऱ्यांसाठी हे वापरला जात असेल तर सगळ्या प्रकार चुकीचा असल्याचं मत पत्रात वरुण सरदेसाई यांनी मांडला आहे. एमएमआरडीए आयुक्तांनी कोणत्या अधिकाराखाली या सार्वजनिक पार्कचा प्रवेश पूर्णपणे बंद केला? करदात्यांचे पैशातून अशा सुविधा का चालवल्या जात आहे ज्या करदात्यांनाच वापरता येत नाहीत? सार्वजनिक सुविधांचे रूपांतर अधिकाऱ्यांच्या बंदिस्त वसाहतीत करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? अशी प्रश्न विचारात या सगळ्याची उत्तर हवी असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी थेट रिकाम्या खुर्चीला हार घालत आंदोलन केलं. शहराला पूर्णवेळ सक्षम अधिकारी द्या, अशी मागणी करत भाजपने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र या आंदोलनानंतर शिवसेना देखील मैदानात उतरली असून, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “अंबरनाथमधील टीडीआर घोटाळ्याच्या फायलींवर सही होत नसल्याने काही सुपारीबहाद्दर मुद्दाम मुख्याधिकाऱ्यांना टार्गेट करत आहेत,” असा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील सेना-भाजप संघर्षात बदलला असून अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
