BMC Standing Committee मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील (Mumbai Municipal Corporation) बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या (Standing Committee Meeting) बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा (Shivkumar Jha) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते थेट सभागृहात पाहायला मिळालेत. त्यामुळेमुंबईच्याराजकीयवर्तुळातएकचआश्चर्यव्यक्तकेलंजातअसून सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड? असाप्रश्नविचारलाजाऊलागलाआहे.

Continues below advertisement

BMC Standing Committee : सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

दरम्यान, स्थायी समितीत सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्यांचे संख्याबळ असून विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मात्र, बैठकीच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील तीन सदस्य अनुपस्थित होते. शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, भाजपच्या राखी जाधव रजेवर होत्या, तर भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हेही रुग्णालयात दाखल होते. अशातच महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सभागृहात संख्याबळ कायम ठेवणे आवश्यक असल्याने शिवकुमार झा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी बोलावण्यात आले.

Continues below advertisement

Shivkumar Jha: अंगावर भागलपुरी शाल अन् कानांवर रुमाल, प्रकृती अस्वस्थ असूनही बैठकीला उपस्थित

दरम्यान, प्रकृती अस्वस्थ असूनही ते अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीदरम्यान त्यांना थंडीचा त्रास होत असल्याचेही दिसून आले. शिवकुमार झा यांनी जीएसटीशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावावरील मतदानात सहभाग घेतल्यानंतर बैठक संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.

Mumnai News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये 89.08% पाणीसाठा; अद्याप पाणीकपात कायम

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये 89.08% पाणीसाठा जमाझालाआहे. मात्रअसेअसताना अद्याप पाणीकपात कायम असल्याचेचित्रआहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणीसाठा आज सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 12 लाख 89 हजार 289 दशलक्ष लिटर (ML) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या मोडकसागर आणि विहार तलाव 100 टक्के भरलेले आहेत. तानसा तलाव 99.58 टक्के, तुळशी 99.46 टक्के, मिडल वैतरणा 91.65 टक्के, भातसा 87.14 टक्के आणि अप्पर वैतरणा 78.39 टक्के भरला आहे. आज सकाळपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार अप्पर वैतरणा येथे 112 मिमी, मिडल वैतरणा येथे 66 मिमी, मोडकसागर येथे 58 मिमी आणि भातसा येथे 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार विहार आणि तुळशी तलाव 7 जुलैपासून, तानसा 22 जुलैपासून आणि मोडकसागर 23 जुलैपासून ओव्हरफ्लो होत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या