Ritu Tawde Fish Market BMC : मुंबई महानगरपालिकेने (BMC) मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाबाबत अफवा पसरवली जाते आहे. कोणीही असे निर्देश दिलेले नाहीत. खोट्या बातम्या पसरवण्याचा कार्यक्रम केला जात आहे. मी बोलले बिनधास्त मासे काप, मी उभी आहे. मासा कसा घ्यावा, हे ग्राहकांवर अवलंबून आहे. सामनात आलेलीही बातमी आहे, इतर कुठेही नाही. मुंबई कोळ्यांची आहे, तीइतर कोणाच्या बापाची नाही. अशीप्रतिक्रियादेतमुंबईच्यामहापौररितूतावडे (Ritu Tawde) यांनी मुंबईतील वाकोला (धोबीघाट) (Vakola) येथील मासळी बाजारात मासे (Fish Market BMC) कापण्यावरीलबंदीच्या निर्णयाबाबतस्पष्टीकरणदिलंआहे.
ठाकरेच्या उबाठा गटाच्या पेजवर आलेली ही बातमी आहे. त्यातकाहीतथ्यनाही. कोळी बांधवांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील आहेत. महिलांना सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळेअशीकुठलीहीबंदीअथवात्यासंदर्भातनिर्णयघेण्यातआलानसल्याचेही महापौररितूतावडेयांनीसांगितलं.
मुंबईतील वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे, अशी अफवा पसरली होती. दरम्यान, आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला होता. यावरुन उबाठाने मुंबई महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं होतं. अशात, महापौर रितू तावडे स्वत: वाकोल्यातील मासेळी मंडईत जात विक्री करणाऱ्या महिलांना आश्वास्त केलं आणि असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं.
Ritu Tawde: मुंबईकोळीसमाजाचीआहे, उबाठाकडून उगाच षड्यंत्र रचलं जातंय
मुंबईकोळीसमाजाचीआहे. मुंबई पालिका देखील उबाठाच्या हातून गेली आहे. त्यामुळेठाकरेंच्यापक्षालाकाहीविषयराहिलेनाहीये. त्यामुळेअशापद्धतीनेतेआपलंदुकानचालवण्याचाप्रयत्नकरतायत. यापुढेजाऊनसांगायचंझालंतरआम्ही महिलांना सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मी संबंधित विभागाला फोन केलाय, मासेविक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्यासंदर्भात काम सुरु आहे. उलट आम्ही मासळी बाजार बांधून देणार आहोत. आईस बाॅक्स देखील आम्ही देतोय. मुंबई कोळ्यांची आहे. असेअसतानामात्र, उबाठाकडून षड्यंत्र रचलं जातंय, रिल बनवून ते व्हीडिओ बनवतायत असेहीस्पष्टीकरणमहापौररितूतावडेयांनीदिलंय.
BMC Assistant Commissioner Alka Sasane : आदेश लेखी स्वरुपात असतात, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
मुंबई महापालिकेचे आदेश लेखी स्वरुपात असतात. आदेशानुसार आणि लेखी स्वरुपात कारवाई होते. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणीही लेखी आदेश असे काढलेले नाहीत. सर्क्युलर गॅजेट असे फाॅर्म्स आहेत, मात्र तसेही आदेश दिले नाही आहेत. असेस्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांनी दिलेआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
