मुंबई : राजधानी मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तर, राजकीय भूमिकांवरही मनोज जरांगे देखील आपली प्रतिक्रिया देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवरही जरांगे पाटलांनी तिखट प्रतिक्रिया देत टीका केली होती. आता, जरांगेंच्या प्रतिक्रियेवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgaokar) यांनी भूमिका मांडली. तसेच, सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा, तर आंदोलकांसाठी आझाद मैदानाची जागा कमी पडत असल्याने आंदोलनासाठी मुंबईतील वानखेडे मैदान उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी म्हटले.

राज ठाकरें यांचा स्वभाव माहित आहे, ते स्पष्ट बोलतात, त्यांच्या पोटात एक ओठात एक नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यवरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांच असं की हे लोक आपले आहेत, त्यांचा लढा सुरू आहे, त्यांना मदत करा, त्यांना मदत कमी पडू नका असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझी सरकारलाही विनंती आहे, आंदोलकांसाठी आझाद मैदानावर असलेली जागा कमी आहे. मराठा बांधवांना इतर व्यवस्था करणे आवश्यक आहे, मुंबईतील वानखेडे स्टेडियम दिलं तर बर होईल, त्यांना एकाच ठिकाणी जागा मिळेल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 

आंदोलकांना काही कमी पडू देऊ नका

आंदोलकांना काही कमी पडू देऊ नका, अशी सूचना आम्ही कार्यकर्त्यांना केली आहे. मी जरांगे पाटील किंवा आलेल्या आंदोलकांना विनंती करतो, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गणपतीमध्ये कोणाला अडचण नको, हा विचार करावा. सरकार कमी पडतेय का हे बोलण उचित नाही. गणपतीमध्ये काही ताण असतो, पण सरकार कमी पडत आहे असे नाही. कारण तेही काम करत आहे, असे म्हणत नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

सकारात्मक मार्ग काढावा

दरम्यान, सरकार यावर विचार करेल सकारात्मक मार्ग काढावा अशी अपेक्षा सरकारकडून आहे. राज्यातील मराठा बांधव राज्यभरातून आले आहेत, त्यांना परवानगी दिली आहे, पण कोर्ट हेच सर्वस्व आहे. न्यायालयात लवकर निर्णय होईल आणि आलेले मराठा बांधव आनंदात परत जातील अशी अपेक्षाही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी; सुट्टी रद्द करुन हायकोर्ट उघडलं, मोठा निर्णय येणार?