एक्स्प्लोर

Metro Slab Accident: ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री फडणवीस जबाबदारी घेतील का? मुलुंडमधील मेट्रो अपघातावरुन काँग्रेसची सडकून टीका, आदित्य ठाकरेही कडाडले

Mumbai Metro Slab Collapsed : ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Mumbai Accident Metro Slab Collapsed मुंबई: मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज (14 जानेवारी) शनिवारी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी अपघाताची घटना घडलीय. एलबीएस रोड (LBS Road) वरील मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला असू बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे 12.20 वाजता या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून विरोधकांनीही या घटनेवरून प्रशासनावर सडकून टीका केली आहे. (Mumbai Accident Metro Slab Collapsed)

Harshvardhan Sapkal : ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का?

मुलूंड मधील LBS रोड वर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला असून 3-4 जण जखमी आहेत. ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? की यातील भ्रष्टाचारात त्यांचीही भागीदारी असल्याने मलमपट्टी करण्यासाठी पुन्हा काहीतरी दुसरे मुद्दे काढून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला आहे.

एमएमआरडीए जबाबदारी घेणार का? हे कोणते कंत्राटदार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का? मेट्रोची काम लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? यात सामन्यांचा जीव जातोय. मेट्रोची काम किती वेगाने सुरू आहे, दाखवण्याचा नादात त्याचा दर्जा आणि सुरक्षा प्रशासन बघणार आहे की नाही? मुंबईकर एकतर खड्ड्यात, नाहीतर मेट्रो बांधकामादरम्यान होणाऱ्या जिवघेण्या अपघातात भरडला जात आहे! अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.

Varsha Gaikwad : मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?

मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ आज दुपारी मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात काही निष्पाप नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय? असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

Varsha Gaikwad : विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको!

मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का? जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त 'चौकशी'चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार? विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको!

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बांधकामाधीन मेट्रो 4 मार्गाचा एक मोठा तुकडा आज एका रिक्षा आणि एका कारवर पडला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग 3 मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही, कदाचित काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल. जर तुम्हाला लक्षात आले तर, काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवलेले आहेत. यासाठी राज्याला काही कोटींचा खर्च येईल आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर, ते पुन्हा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील. आजही, बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये भयानक बॅरिकेडिंग आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहने उघड्या खड्ड्यात पडतात.

भाजप राजवटीत जीवनाचे काही मूल्य नाही. मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार/बाईक उघड्या खड्ड्यात पडणे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे! लवकरच असा दिवस येईल जेव्हा देश आपल्या देशातही अशा गोष्टींसाठी प्रवासाचे इशारे देतील. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Who is Ramrao Wadkute: राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Embed widget