एक्स्प्लोर

तक्रारी अन् पुरावे बघा.. रोहित पवारांनी शेअर केली कागदपत्रे; म्हणाले, हा फक्त ट्रेलर, MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी, अनिमित्तता आणि भोंगळ कारभाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई : राज्यात सध्या पेपरफुटीवरुन वातावरण तापलं असून एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेतील औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यातच, काल पुण्यातल मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. या मोर्चात आमदार रोहित पवारांसह विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. त्यात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर, माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही, असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं होतं. आता, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भीमनवार यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचारा आरोप झाल्याची तक्रारच पुरावा म्हणून दिली आहे. 

एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी, अनिमित्तता आणि भोंगळ कारभाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. वस्तूस्थिती स्पष्ट करूनही माझ्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने मी व्यथित झालो आहे. माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही, असं विवेक भीमनवार म्हणाले. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी भीमनवार यांच्याविरुद्धच्या काही तक्रारी समोर आणल्या आहेत. तसेच, या पदावर बसणाऱ्या  व्यक्तीसंदर्भात पुरावे काय तर साधा आरोप सुद्धा झालेला नसावा, असेही त्यांनी म्हटले. 

MPSC आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि संवैधानिक पद आहे, या पदावर बसणाऱ्या  व्यक्तीसंदर्भात पुरावे काय तर साधा आरोप सुद्धा झालेला नसावा. भीमनवार साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या ऐतिहासिक अशा पेपरफुटीवर विद्यार्थी राजीनामा मागत असताना नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने ती नैतिकता त्यांच्याकडे दिसत नाही. पुरावे दिले तर क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईल, असे भीमनवार म्हणाले होते. परिवहन आयुक्त असताना भीमनवार यांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला, यासंदर्भात त्यांच्याच विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पुरावे बघा, असे म्हणत रोहित पवारांनी तक्रारीचे कागदपत्रे शेअर केली आहेत. 

हा फक्त ट्रेलर, आणखी खूप आहे...

हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो.. बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड गाड्यांच्या लिस्ट, वरळी वाहनखरेदी प्रकरणी लाचलुचपत विभागाने केलेली चौकशी...... आणखी खूप काही आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत थेट इशाराच दिलाय. 

तक्रारी अर्जात काय?

परिवहन आयुक्त असताना भीमनवार यांच्याविरुद्ध एका आरटीओ अधिकाऱ्याने तक्रार केली होती. वाहन खरेदीच्या संबधाने अनुभवी व या कामकाजाशी संबंधीत सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता करणाऱ्या एजन्सीज केंद्र शासनाच्या GeM पोर्टलवर उपलब्ध असताना देखील e-Tendering (ई-निविदा) करुन एका विशिष्ट कंपनीला व व्यक्तींच्या समुहाला फायदा व्हावा याकरीता अप्रमाणिक हेतूने संदर्भ क्र. 4 नुसार बेकायदेशीर कार्यादेश (Work Order) देण्यात आला. विवेक भीमणवार, परिवहन आयुक्त, भरत कळसकर, परिवहन सह आयुक्त यांनी संगनमताने सदर खरेदीमध्ये व्यावसायिक मक्तेदारी, लबाडी, अनुचित आर्थिक लाभाच्या फायद्यासाठी शासनाच्या GeM पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या उपकरणांची खरेदी न करता स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी एका विशिष्ट उद्योग समुहास फायदा व्हावा याकरिता स्पर्धा अधिनियम, 2002 च्या ईष्टतम स्पर्धेच्या धोरणास खालील प्रमाणे छेद दिलेला आहे.

हेही वाचा

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं

Embed widget