MPSC FDA Paper Leak:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drugs Inspector) पदाच्या भरती परीक्षेभोवतीचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधी फुटल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, नंतर सूत्रांच्या हवाल्याने पेपर फुटल्याची तक्रार बनावट ई-मेलवर आधारित असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी या परीक्षेतील काही उमेदवारांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: फेसबुक पोस्टमधून उपस्थित केले गंभीर प्रश्न
मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, MPSC मध्ये नेमकं काय घडलं? विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? आमचा कोणत्याही उमेदवाराविरुद्ध वैयक्तिक आक्षेप नाही. आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून सत्य, पारदर्शकता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे. डिसेंबर 2025 मध्ये FDA Chemical Analyst परीक्षा झाली आणि त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी मार्च 2026 मध्ये Drugs Inspector परीक्षा झाली.या दोन्ही परीक्षांच्या निकालांमधील काही उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: तीन विद्यार्थ्यांची उदाहरणे
1) पायल लांडेFDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210Drugs Inspector – Rank 31
2) ऋतुजा अमृत पाटीलDMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21222Drugs Inspector – 155 गुण | Rank 7
3) सागर रामलिंग थिटेDMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21160Drugs Inspector – 150 गुण | Rank 14
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: चौकशी पूर्णपणे निष्पक्ष होईल का?
मेहबूब शेख यांनी पुढे म्हटले आहे की, "ही केवळ काही उदाहरणे आहेत. अशा प्रकारची आणखी अनेक प्रकरणे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनत, अभ्यास आणि योग्य तयारीमुळे कामगिरीत सुधारणा होऊ शकते, याबद्दल कोणताही वाद नाही. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत हजारोंच्या रँकमधून राज्यातील अव्वल क्रमांकांपर्यंत झालेला हा बदल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. याशिवाय, काही उमेदवारांचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींसोबतचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. केवळ फोटो किंवा ओळख यावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. मात्र त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे 'या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्णपणे निष्पक्ष होईल का? सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का?' हा प्रश्न काही मोजक्या विद्यार्थ्यांचा नाही; राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आहे."
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: मेहबूब शेख यांच्या मागण्या
- Drugs Inspector परीक्षेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
- आवश्यक असल्यास डिजिटल फॉरेन्सिक, सर्व्हर लॉग्स आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात यावी.
-चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहील.
आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही. पण हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा एकच मार्ग आहे निष्पक्ष चौकशी. प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. न्याय मागणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
