Mohit Kamboj Daughter Birthday Party: भाजपचे नेते आणि व्यावसायिक मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची कन्या मिश्का कंबोज हिच्या 16 व्या वाढदिवसाचा सोहळा मुंबईत अत्यंत शाही थाटात पार पडला. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित या पार्टीने सर्वांचेच डोळे दिपवले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, राजकीय वैर विसरून सर्वपक्षीय नेते आणि बॉलिवूडचे सुपरस्टार्स एकाच छताखाली पाहायला मिळाले. (Mohit Kamboj Daughter Birthday Party)

Continues below advertisement

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीने वेधले लक्ष

या सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीची. महाविकास आघाडीच्या काळात मोहित कंबोज आणि ठाकरे गट यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. एकमेकांवर टोलेबाजी करणारे हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

Anant Ambani: अंबानी कुटुंबीयांची विशेष हजेरी

याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही मिश्का कंबोजला शुभेच्छा दिल्या. भाजपचे अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. अंबानी कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे कंबोज यांच्या कन्या मिश्का हिच्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली आहे.

Continues below advertisement

Mohit Kamboj Daughter Birthday Party: बॉलिवूडची 'रंगत' आणि रणवीरचा परफॉर्मन्स

केवळ राजकारणच नाही, तर सिनेसृष्टीतील दिग्गजांनीही या पार्टीला चार चाँद लावले. किंग खान शाहरुख खान याने या सोहळ्याला हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधले. रणवीर सिंह याने स्टेजवर आपल्या गाण्यांच्या टायटल ट्रॅकवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला, ज्याला संजय दत्त याने उत्स्फूर्त दाद दिली. सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त आणि अमृता अरोरा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याची शोभा वाढवली.

Mohit Kamboj Daughter Birthday Party: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

एकीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून नाराजी असल्याच्या चर्चा असताना, दुसरीकडे भाजप नेत्याच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंची उपस्थिती बरेच काही सांगून जाणारी आहे. यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जवळीक वाढणार का? की हा केवळ कौटुंबिक स्नेह आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut: आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??