एक्स्प्लोर

MNS Shivsena UBT BMC Election 2026: मोजक्या जागांवर लढलो, पेच निर्माण केला नाही; आता ठाकरे गटाने एक जागा सोडावी, मनसेच्या बैठकीत काय घडलं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray MNS Shivsena UBT BMC Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray MNS Shivsena UBT BMC Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये तीन स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये देता येणार आहेत. या तीन पैकी दोन नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक नगरसेवक मनसेचा असावा असं मनसेच्या नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. (MNS-Shivsena UBT BMC Election 2026)

जागा वाटपावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी कुठलाही आग्रह मनसेने केला नाही किंवा जागा वाटपाच्यावेळी पेच निर्माण केला नाही. त्यामुळे आता तरी ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागांपैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी, असं मत मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

मनसे पक्षाला सत्ताधारी पक्षांचासुद्धा प्रस्ताव- (MNS Raj Thackeray)

मनसे पक्षाला सत्ताधारी पक्षांचासुद्धा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत विविध पदावर निवडून आलेले सहा नगरसेवकांना संधी मिळावी त्यासोबतच स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा इतर प्रस्तावांचा सुद्धा विचार केला जावा, असेही मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकापैकी एक स्वीकृत नगरसेवकांचे पद मनसेला देणार का? आणि तिन्हीही स्वीकृत नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेने दिले तर मनसे काही वेगळी भूमिका घेणार का? हे लवकरच समोर येईल. 

10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार- (BMC Swikrut Nagarsevak)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहात पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत (Vidhan Parishad) पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहावर वाढवण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपाकडे (BJP) सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना तसेच काँग्रेसला देखील स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत.

स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? (BMC Election 2026 Swikrut Nagarsevak)

स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1 
-------------------------
एकूण- 227

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Embed widget