मुंबई : संजय दिना पाटील यांच्या मुलीला महापालिकेचं तिकिट देऊ नका हे आपण उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, ते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आधीच दिली होती असा गौप्यस्फोट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. या ठिकाणी मनसेच्या माजी नगरसेविकेला तिकीट द्यावी यासाठी आम्ही आग्रही होतो, असंही ते म्हणाले. ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असून त्यामध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. तर त्यांच्या कन्या राजुल पाटील (Rajool Sanjay Patil) या भांडुपमधून ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत. 

Continues below advertisement

संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील या भांडूपच्या प्रभाग क्रमांक 114 मधून नगरसेविका आहेत. या जागेवर मनसेने दावा केला होता. परंतु ऐन वेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे राजुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावरून आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंचा आधीच कल्पना दिली

ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात होते, याची माहिती आपण उद्धव ठाकरे यांना आधीच दिली होती असा दावा संदीप देशपांडे यांनी केला. ते म्हणाले की, "संजय दीना पाटील यांच्या कन्येला महापालिका तिकीट देऊ नका हे मी उद्धव ठाकरे यांना त्यावेळी सांगितलं होतं. मला आधीच माहिती होती की खासदार संजय दिना पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. आमच्या त्या ठिकाणच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांना मुंबई महापालिकेचे तिकीट द्यावं यासाठी आम्ही आग्रह केला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी कल्पना दिली होती की संजय दिना पाटील हे तुमच्या पक्षासोबत राहणार नाहीत."

Continues below advertisement

संदीप देशपांडे म्हणाले की, या आधी मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी टू थर्डचा नियम आहे असं अनिल परब ओरडून सांगत होते. आता त्यांच्याच पक्षाचे अरविंद सावंत आणि संजय राऊत हे या सगळ्या विरोधात बोलत आहेत. त्यावेळी आमचे नगरसेवक फोडले आज यांचे खासदार फुटले, ठीक आहे. पण जो उमेदवार ज्या पक्षातून निवडून आला, ज्या पक्षाच्या चिन्हावरून निवडून आला, त्याला फोडणं किंवा त्याने फुटणं हे योग्य नाही.

आज बेस्ट बसचा संप आहे, राज्यातील शेतकरी हवालदिल आहे, अनेक प्रश्न आहेत. मात्र सरकार पक्ष फोडण्याच्या कामात व्यस्त आहे अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटले?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळ- वाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

Uddhav Thackeray Shivsena MP List : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)

3. राजाभाऊ वाजे (नाशिक)

ही बातमी वाचा: