Sandeep Deshpande on Bhagat Singh Koshyari : भगत सिंह (Bhagat Singh) आज जर असते तर त्या कोश्यारीला खूप चोपला असता, त्या कोश्यारीने पहिलं नाव बदलावं, अशीआम्हीमागणीकरतो. अशाशब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचावर बोचरी टीकाकेलीआहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर भाषिक मुद्द्यावरून टीका केली होती. यावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पलटवार केला होता. जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवारकरत बोचरी टीकाकेलीय.
Sandeep Deshpande on Chandrapur Mayor: शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी, वरून वेगळ्या ऑफर
चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे कि, शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असामोठंवक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनीकेलंआहे. खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवलं कि त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावं लागेल. संजय राऊत यांच असं झालंय कि 'तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला' असं कसं चालेल, अशाटोलाही संदीप देशपांडे यांनीखासदार संजय राऊतांनालगावलाआहे.
Sandeep Deshpande on BMC : मुंबई शहरात बेस्टची केबल असताना टाटा पॉवरला परवानगी का देण्यात आली?
दक्षिण मुंबईत ट्रॅफिक कर संदर्भात आमची तर ही मागणी आहे की ऍमेझॉन, ब्लीनकीट इतर पैसा कमवणाऱ्या कंपन्यावर कर लावला पाहीजे. मुंबईत सिमेंटचे रोड सुरु झाले आहेत त्याची काम सुरु आहेत. हे रोड बनवून झाल्यावर ते पून्हा खोदायचे काम सुरु झाली आहेत. याला कोणी परवानगी दिली आहे? CC रोड बनवल्यावर रोड खोदण्याची गरज काय पडली? रोड खोदल्यावर मुंबई शहरात बेस्टची केबल असताना टाटा पॉवरला परवानगी का देण्यात आली? टाटापॉवरला परवानगी देताना म्हटले आहे कि 220k केबल टाकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या इलेक्ट्रिक केबल नाहीत त्या ऑप्टिकल फायबर केबल का टाकण्यात येत आहेत? टाटा पॉवरला परवानगी दिलीय, तर चार प्रकारच्या केबल का टाकल्या जातायत? असेअनेकप्रश्न संदिप देशपांडे यांनीयावेळीउपस्थितकेलेआहेत.
Sandeep Deshpande : अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे
दरम्यान, आम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक केली. त्या अधिकाऱ्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं. त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवली आहे. याच्या अगोदर राज साहेब आणि आम्ही पालिकेत भूषण गगराणी यांना भेटलो होतो. जेव्हा केबल टाकण्यासाठी खोदकाम केलं जात तेव्हा फक्त खड्डे भरण्याचे पैसे त्यांना दिले जातात. पालिकेला अधिक पैसा का दिले जात नाहीत? कोणते अधिकारी आहेत ज्यांनी अधिकाऱ्याच्या बाहेर जाऊन काम केले जात आहेत. या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. लोकांना त्रास होतो, हे पालिकेला काही कळत नाही का? पालिकेला ठणठण भोपाळा मिळतोय. आतापर्यंत प्रशासन होत त्या काळात सर्व सुरु होतं. आता नगरसेवक आवाज उठवतील, असं वाटतय. पण आमचे नगरसेवक देखील आवाज उठवतील असेहीसंदीपदेशपांडेम्हणाले.
आणखी वाचा
- Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
- Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस, नीट धोतर नेसता येत नाही अन् आम्हाला अक्कल शिकवतोय; संजय राऊतांनी धू-धू धुतलं
