Sandeep Deshpande : मुंबईतील आयुक्तांना जिलबी आणि फाफडा आम्ही भरवू, मुंबईतील मच्छीमार आत्ता जिलबी आणि फाफडा विकणार का? असासंतप्तसवालकरतमहाराष्ट्रनवनिर्माणसेनेचेनेतेसंदीपदेशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुंबई महानगरपालिकेने (BMC) मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर घातलेल्याबंदीच्यानिर्णयावरूनप्रशानाला जाबविचारलाआहे. मुंबईतील वाकोला (धोबीघाट) (Vakola) येथील मासळी बाजारात मासे (Fish Market BMC) कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) बंदी घातली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण प्रशासनाने पुढंकरतहेबंदीचेआदेशदिलेआहे. तर पालिका अधिकाऱ्यांनी कोळी महिलांना (Koli Women) आता बाजारात मासे कापून न देता, केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. याचनिर्णयावरबोटठेवतमनसेनेतेसंदीपदेशपांडेयांनीरोषव्यक्तकेलाआहे.

Sandeep Deshpande: अधिकाऱ्यांना गुजरात्यांतची नोकरी करायला ठेवलं आहे का?

मासळी बाजारात मासे कापण्यावर अचानक घालण्यात आलेल्या या बंदीच्या निर्णयामुळे मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  तरदुसरीकडेहानिर्णयमनमानीकारभारअसल्याचंमतकोळीबांधवांनीव्यक्तकेलंआहे. अशातच, ज्यांना माश्यांचा तिटकारा आहे त्यांनी गुजरातला जावं. अधिकाऱ्यांना गुजरात्यांतची नोकरी करायला ठेवलं आहे का? असासंतप्तसवालहीमनसेनेतेसंदीपदेशपांडेयांनीयावेळीउपस्थितकेलाआहे.

Mumbai Mayor Ritu Tawde : अशी कारवाही झालीं असेल तर योग्य नाही, आम्ही त्यात लक्ष घालू 

दरम्यान या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे अशी कारवाही झालीं असेल तर योग्य नाही, आम्ही त्यात लक्ष घालू अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितु तावडे यांनी दिली आहे. तर काय लॉजिक, आम्ही कसं काय खायचं हे कोण ठरवणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Sandeep Deshpande: दिल्लीतील भय्यांना खुश करण्याचे प्रयत्न

अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. मनसेने विनंती केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेला स्थगिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. परीक्षा कायमसाठी रद्द करण्याची आम्ही उदय सामंत यांची भेट घेऊन मागणी करू. हे दगड मारून बघतायत. दिल्लीतील भय्यांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने आपला मराठी भाषेचा अभिमान जपला पाहिजे, असेहीमनसेनेतेसंदीपदेशपांडेम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या