Chandrapur Municipal Corporation : राज्यभरातगेल्याकाहीदिवसापासूनचंद्रपूरमहानगरपालिकाअनेककारणांनीचर्चेच्याकेंद्रस्थानीआलीआहे. असताच चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आलेत. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी मोठा दावा केलाय. दरम्यान, या आरोपांवर उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढले आहे. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावेद्यावे. त्यांचादावाखरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल. असं जाहीर आव्हान केलं होतं. यावरूनआतापुन्हाएकदा मनसे नेते संदीप देशपांडेंनीचंद्रपूरच्याठाकरेसेनेलाडिवचलंआहे. (Chandrapur Municipal Corporation)
Sandeep Deshpande : एक खोक्याचा "पुरावा देणार म्हणजे देणार
चंद्रपूर उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी केलेल्याआव्हानालाप्रत्त्युत्तरदेतानासंदीपदेशपांडेयांनीएकपोस्टशेयरकेलीआहे. त्याततेम्हणालेकि, 'ज्या दिवशी जनतेला तुम्ही "पन्नास खोक्यांचे " पुरावे द्याल, त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूर मधल्या "एक खोक्याचा "पुरावा देणार म्हणजे देणार.' असेतेम्हणालेआहेत. त्यामुळेआतामनसेआणिठाकरेंच्याशिवसेनेतपुन्हाएकदाखडाजंगीसुरूचअसल्याचेबघायलामिळालंआहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी भाजप आणि शिवसेना उबाठा यांची नुकतीच चंद्रपूर महानगरपालिकेत युती झाली. विशेष म्हणजे शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत बोलणी सुरू होती. मात्र, अचानक बोलनी फिस्कटल्याने शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे हे वडेट्टीवार यांच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांना संपर्क केला. दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर (Chandrapur) महापालिकेत काँग्रेसच्या धरसोड वृत्तीमुळे अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं येथे काँग्रेसऐवजी भाजपला साथ देत भाजपचा महापौर केला, तर शिवसेनेला उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशातचठाकरेबंधुंच्यापक्षातहीशाब्दिकयुद्धरंगल्याचेचित्रआहे.
Sandip Girhe : शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी पण....; संदीप गिर्हे नेमकंकायम्हणाले?
मनसे नेते संदीप देशपांडे यांना ही माहिती कोणी दिली हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी नाव जाहीर करावं, आम्हाला जर कोणी पैसे देऊन विकत घेतलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमचा कितीदा अपमान केला, हे आम्हालाच माहित आहे. जर आम्हाला भाजपकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी केली नसती, कारमध्ये 15 मिनिटं उरले असताना भाजपसोबत वाटाघाटी केली नसती. एक कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती. आम्ही जे काही केलं ते स्वाभिमानासाठी केलं, संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये, त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो असेही संदीप गिर्हे म्हणाले.
चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)
एकूण नगरसेवक 66
काँग्रेस – 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
भाजप – 23
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित - 2
बसपा - 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1
इतर महत्वाच्या बातम्या
