मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी (Pune) पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतली. मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय, तुम्हाला आलेला राग हा तात्पुरता असू नये, असे म्हण राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या मराठी मुला-मुलींसाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले तर राज ठाकरे तयार आहे, पण तुमचा सरकारवर दबाव वाढला पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच, मी इथं तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय, असे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटले.
मुंबईत ज्या प्रकारे मोर्चा झाला, मी तिथं सांगितलं, तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मत फुटतात. जसं तुमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात, तसे आमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात. नुसती बेधुंदशाही सुरूय, एकाच बाजुने मन की बात सुरू आहे. दुसऱ्या बाजुला जणू काही मनच नाही. आपल्या आयुष्यातील एकेक वर्षे सरत आहेत, पुढे पुढे जात आहेत. आम्ही निवडणुका लढवल्यानंतर आमच्या लक्षात येतं की, आमच्याकडे मतं पळवली जातात, आमच्याकडे पाच-पाच वर्षे निघून जात, पाच वर्षांचं काळ खूप मोठा आहे.
अनेक मुलं आहेत जी कर्ज काढून आली आहेत, वडिलांनी कसे पैसे घेऊन त्यांना इथं पाठवलं असेल. तुम्हाला जटील प्रश्नांमध्ये अडकवलं जातंय, यातून पहिलं बाहेर या. मराठवाडा, महाराष्ट्रातून अनेक मुलं इथं पुण्यात शिकायला आले आहेत. आज मी तुमच्या मागण्या पाहिल्या, 70 हजारांची मेगा भरती सरकार म्हणतंय, पण मी सांगतो, ही भरती होणार नाही. कारण, वस्तुस्थिती समजून घ्या, कुणाचंही सरकार आलं तरी 70 हजारांची भरती होणार नाही. कारण, नोकऱ्या मिळाल्या तर तुम्ही आंदोलनं कशाला करताल, असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. तसेच, सध्या सगळं खासगीकरण करण्याचं काम सुरू आहे, विमानतळं द्या अदानीला, हे द्या, ते द्या अदानीला
मराठी मुलांच्या नोकरीसाठी राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार
सरकारची धोरणं चुकत आहेत. मात्र, मतदान करतेवेळी पैसे फेकले जातात, जेवणावळी दारू दिले जातात. त्यामुळे, असे लोक निवडून आलेल्याचा गैरसमज दूर होत नाही, तोवर न्याय मिळणार नाही. या पक्षातील, त्या पक्षात जातात, तुमचे म्हणणे ऐकण्याची भीती निर्माण करा, असे आवाहन राज ठाकरेंनी तरुणंना केले. मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला भेटायला आलोय, तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत, कुठल्याही मार्गाने. मराठी मुलांच्या नोकरीसाठी राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं. वस्तुस्थिती नीट समजून घ्या, सरकारवर तुमचा दबाव वाढला पाहिजे, मी राजकारण करण्यासाठी आलो नाही, मला ते जमतही नाही. मी बोलतो ते कटू असते, हळूहळू लोकांना कळते, जेव्हा आपल्या दरवाजावर टक टक होईल तेव्हा लक्षात येते, असे म्हणत लवकर प्रश्न मार्गी लागला जावा, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले.
