एक्स्प्लोर

Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'

मुंबईत ज्या प्रकारे मोर्चा झाला, मी तिथं सांगितलं, तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मत फुटतात. जसं तुमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात, तसे आमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात.

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी (Pune) पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतली. मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय, तुम्हाला आलेला राग हा तात्पुरता असू नये, असे म्हण राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या मराठी मुला-मुलींसाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले तर राज ठाकरे तयार आहे, पण तुमचा सरकारवर दबाव वाढला पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच, मी इथं तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय, असे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटले. 

मुंबईत ज्या प्रकारे मोर्चा झाला, मी तिथं सांगितलं, तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मत फुटतात. जसं तुमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात, तसे आमच्या आयुष्यातील वर्षे निघून जातात. नुसती बेधुंदशाही सुरूय, एकाच बाजुने मन की बात सुरू आहे. दुसऱ्या बाजुला जणू काही मनच नाही. आपल्या आयुष्यातील एकेक वर्षे सरत आहेत, पुढे पुढे जात आहेत. आम्ही निवडणुका लढवल्यानंतर आमच्या लक्षात येतं की, आमच्याकडे मतं पळवली जातात, आमच्याकडे पाच-पाच वर्षे निघून जात, पाच वर्षांचं काळ खूप मोठा आहे.  

अनेक मुलं आहेत जी कर्ज काढून आली आहेत, वडिलांनी कसे पैसे घेऊन त्यांना इथं पाठवलं असेल. तुम्हाला जटील प्रश्नांमध्ये अडकवलं जातंय, यातून पहिलं बाहेर या. मराठवाडा, महाराष्ट्रातून अनेक मुलं इथं पुण्यात शिकायला आले आहेत.  आज मी तुमच्या मागण्या पाहिल्या, 70 हजारांची मेगा भरती सरकार म्हणतंय, पण मी सांगतो, ही भरती होणार नाही. कारण, वस्तुस्थिती समजून घ्या, कुणाचंही सरकार आलं तरी 70 हजारांची भरती होणार नाही. कारण, नोकऱ्या मिळाल्या तर तुम्ही आंदोलनं कशाला करताल, असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. तसेच, सध्या सगळं खासगीकरण करण्याचं काम सुरू आहे, विमानतळं द्या अदानीला, हे द्या, ते द्या अदानीला

मराठी मुलांच्या नोकरीसाठी राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार

सरकारची धोरणं चुकत आहेत. मात्र, मतदान करतेवेळी पैसे फेकले जातात, जेवणावळी दारू दिले जातात. त्यामुळे, असे लोक निवडून आलेल्याचा गैरसमज दूर होत नाही, तोवर न्याय मिळणार नाही. या पक्षातील, त्या पक्षात जातात, तुमचे म्हणणे ऐकण्याची भीती निर्माण करा, असे आवाहन राज ठाकरेंनी तरुणंना केले. मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला भेटायला आलोय, तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत, कुठल्याही मार्गाने. मराठी मुलांच्या नोकरीसाठी राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं. वस्तुस्थिती नीट समजून घ्या, सरकारवर तुमचा दबाव वाढला पाहिजे, मी राजकारण करण्यासाठी आलो नाही, मला ते जमतही नाही. मी बोलतो ते  कटू असते, हळूहळू लोकांना कळते, जेव्हा आपल्या दरवाजावर टक टक होईल तेव्हा लक्षात येते, असे म्हणत लवकर प्रश्न मार्गी लागला जावा, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले. 

हेही वाचा

मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
Nitin Gadkari Nagpur : 'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget