MNS on Mangal Prabhat Lodha : राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या विरोधात आज मनसेच्या मलबार हिल शाखेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. संबंधित मंगल प्रभात लोढा यांचं पत्र समोर आलं. त्यानंतर याप्रकरणाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत लोढा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केलीय. यावेळी कार्यकर्त्यांनी लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या पत्रामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, असा आरोप करत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
MNS : पत्रामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, लोढा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पत्र अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलंहोतं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे हॉटेल व्यवसाय यात भरडला जातोय तर दुसरीकडे सामान्यांना देखील गॅस सिलेंडर तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच पाच सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पत्र मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीदिल्याने वाद निर्माण झाला आहे. आम्ही गिरगावकर संघटनेसह गिरगावातील जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांनी याचा कडाडून विरोध केला आहे. अशातचआतामनसेनेदेखीलमैदानातउतरतयाप्रकारालाविरोधदर्शवलाआहे.
Mangal Prabhat Lodha: नेमकंकायम्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
हिंदू सण आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर टीका करणे ही एक फॅशन झालीआहे. धार्मिक कार्यक्रमासाठी विशेष कोट्यामधून गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा लागतो. त्या प्रमाणे मी माझ्या मतदारसंघात कोणत्याही समुदायाला विशेष पसंती न देता सर्वांना धार्मिक कार्यक्रमात सहकार्य केले. यात गैर काय? या पुढे देखील माझ्या मतदारसंघात हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे कार्यक्रम आहेत. त्यांना सुद्धा मी सहकार्य करेल. अशीप्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीदिली.
Mangal Prabhat Lodha Letter On Gas : लोढांच्या पत्रावरुन वाद, मनसेच्या वतीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार
लोढा यांच्या या पत्रावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला. मनसेनं थेट गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करून, गॅसचा काळाबाजार झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Mangal Prabhat Lodha : माझ्यावरती जेआरोपहोताय ते राजकीय हेतूने होत आहेत
दुसरीकडेयाप्रकरणीबोलताना मंगल प्रभात लोढा म्हणालेकि, माझ्यावरती जे आरोप होत आहेत ते राजकीय हेतूने होत आहेत. मी माझ्या विधानसभा पुरतच ही गोष्ट केली होती. मी शिर्डीच्या मंडळाला देखील सिलेंडर द्यायचं, आश्वासन केलं होतं. त्याचप्रमाणे जैन समाजाच्या उद्याच्या कार्यक्रमाला देखील द्यायचं, मी म्हणालो होतो. कुठल्याही विशेष एका धर्माला मी द्यायचं असं कधीही केलं नाही.
इतरमहत्वाच्याबातम्या
