एक्स्प्लोर

Sandeep Deshpande: आमच्या अधिकाऱ्यांवर हिंदी लादली, तर...! मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला इशारा, असीम सरोदेंनाही प्रत्युत्तर

Sandeep Deshpande: महाराष्ट्राची राजभाषा मराठीच असली पाहिजे, अशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार आहे.

मुंबई : राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. भाषा संचालनालयाने 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं या परीक्षेचं आयोजन केलं आहे. मात्र, राज्यात मराठी भाषा सक्तीची असताना हिंदी परीक्षेचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल मराठी भाषा अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच या निर्णयावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संताप व्यक्त करत अशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार असा इशारा दिला आहे. 

Sandeep Deshpande: आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर...

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काल राज्य शासनाने राजपत्रित आणि राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे. एकीकडे आपण मराठी भाषा बोलली पाहिजे यासाठी आग्रही आहे, महाराष्ट्राची राजभाषा मराठीच असली पाहिजे, अशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार आहे. जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल, जाणीवपूर्वक दिल्लीत बसलेल्या भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असंही देशपांडे पुढे म्हणालेत.

Sandeep Deshpande: जाणीवपूर्वक दिल्लीतील भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू

अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याच राज्य सरकारने उत्तर द्यावं. पडद्याआडून हिंदी भाषा सक्तीचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. जाणीवपूर्वक दिल्लीतील भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, पडद्याआडून हिंदी सक्ती लागू करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचा अजेंडा आहे, हिंदू हिंदी हिंदुस्तान आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असंही पुढे देशपांडेंनी म्हटलं आहे. 

Sandeep Deshpande:  असीम सरोदेंसारख्या माणसाला कळणार नाही

तर नसरापूर प्रकरणी चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या (Nasrapur Girl Death) आपल्या सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवणारे वक्तव्य केलं. राज ठाकरेंसारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य चुकीचं आहे. पोलिसांनी त्यांना समज द्यावी असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं, असीम सरोदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही बोललो ते बोललो सरोदेंना जे काही करायचं ते करावं, शक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार? सरकार संवेदनशील नाही म्हणून असे प्रकार घडतायेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही. हे असीम सरोदेंसारख्या माणसाला कळणार नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे.

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger : ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
West Bengal : महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार

Embed widget