Ravi Rana on NCP Merger : राजकारणामध्ये अशक्य वाटणाऱ्यागोष्टी शक्य झाल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (NCP Merger) येतील. सुनेत्रापवार (Sunetra Pawar)आणिशरदपवार (Sharad Pawar) यांचेपक्षएकत्रयेतील. दिल्लीआणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) मंत्री बनतील. तरराज्याचीसूत्रसुनेत्रा पवार यांच्याहातीअसतील. असादावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलाआहे. तेअमरावतीतबोलतहोते. दरम्यान, पुढेसांगायचंचझालंतरराजकारणातकाहीजरीअसलंतरीसर्वकाहीशक्यआहे. त्यामुळे सुप्रिया सुळे मंत्री बनतील. आणिसुनेत्रापवारराज्यबघतील, येत्यापंधरादिवसातहेचित्रआपल्यालादिसेल, असेहीतेम्हणाले.
Uddhav Thackeray and Eknath Shinde: ....तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र आलेलेदिसतील
उद्धव ठाकरे यांनी देखील आताहातातरामरक्षाघेतलीआहे. गेल्याकाळातत्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री पद गेलं, आमदार गेले, खासदार गेले. पण गेल्या काही दिवसाआधी त्यांनीमुंबईमध्येहनुमानचालीसा वाचली, तरआता राम रक्षा वाचण्यासाठी तेनागपूरच्या राम मंदिरामध्ये 18 तारखेला येत आहे. त्यांनामाझंइतकंचसांगणंआहेकि, त्यांनीरेशीमबागयेथेजाऊनडॉ. हेडगेवारांच्या स्मारकाला वंदन करून यावं. तसेचअमरावतीच्या हनुमान गडीवर येऊनहनुमानचालीसाचे वाचन करा. मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये, काही महिन्यामध्येचआपल्याला हे सुद्धा चित्र बघायलामिळेलकि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेलं दिसेल. कारणउद्धवठाकरेयांनी हनुमनंतानास्वीकारलंआहे. राम भगवान आणित्यांच्या विचाराला स्वीकारलेलआहे. उद्धव ठाकरे वापस आलेल्या म्हणून हे अध्यक्ष ठाकरे आणि राम भगवंताच्या विचाराला स्वीकारला आहे.
Sharad Pawar: सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी दिली भेट
बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती शरद पवारांनी घेतली. याबाबत बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय आहे. बदलत्या जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास यांची जडणघडण विद्या प्रतिष्ठानमध्ये होताना दिसते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
