VIDEO : मी गोमूत्र खूप पितो, ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं; मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलंय.

Minister Nitesh Rane : महाराष्ट्रातील मत्स व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिलीये. सध्या उन्हाळा आलाय. तुम्ही रुह अफजा पिता की गुलाब शरबत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच उत्तर देताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत की, मी गोमूत्र फार पितो. मी तुम्हाला सांगतो ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं.
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, गुलाब आणि रुह अफजा मला कोण देत? याच्यावर बरचं काही डिपेंड आहे. मी रुह अफजा वगैरे पित नाही. रुह अफजा देणारा माणूस कोण त्यावर ते अवलंबून आहे. रुह अफजा मला कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही. तुम्ही विचार करा रुह अफजा नितेश राणेला कोण देईल? तो फार गोड असतो मला आवडत देखील नाही.
रामदेव बाबांनी केलं सरबतबाबत वादग्रस्त वक्तव्य
यापूर्वी रामदेव बाबाने रुह अफजाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत होतं. रामदेव बाबा (Ramdev Baba) म्हणाले होते की, "तुम्ही जर शरबत पित असाल तर मशीद आणि मदरसा बनाल. पतंजलीचा सरबत प्याल तर कुलगुरू बनाल. इस्लाममध्ये 'सरबत जिहाद' आहे. जसा वोट जिहाद आणि लव्ह जिहाद सुरु आहे, तसाच सरबत जिहाद देखील सुरु आहे", असं रामदेव बाबा म्हणाले होते. मात्र, टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव केली होती. रामदेब बाबा त्यांच्या बिझनेससाठी अशी वक्तव्य करतात, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर केला होता.
गरमी आ गई है क्या पी रहे हो आजकल?
— RaGa For India (@RaGa4India) April 21, 2025
मंत्री नितेश राणे: मैं तो गाय का मूत्र पीता हूं और बहुत पिता हूं।
अब मुंह से गोबर करना तो अनिवार्य हो गया है। pic.twitter.com/vUS7QrLeaq
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. आमच्यावर आरोप केला जातो की, आम्ही पक्ष बदलत राहतो. उद्धवजींनी आमच्यासोबत वाईट राजकारण केलं नसतं तर आम्ही गर्वाने सांगितलं असतं की, आम्ही शिवसैनिक आहोत. माझ्या वडिलांनी हिंदूत्वासाठी जे केलंय ते मी पॉडकास्टमध्ये बोलू शकत नाही. आमचं रक्त भगवं आहे, कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या छत्रछायेत वाढलोय आणि हिंदूत्व फॉलो करत आलो आहोत. आम्ही 12 वर्ष काँग्रेसमध्ये काढले कारण आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. काँग्रेसमध्ये असताना आमचं रक्त भगवंच होतं. आता भाजपमध्ये आल्यानंतर मी अभिमानाने सांगू शकतो की, आमचं रक्त भगवं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















