Bharat Gogavale : रायगडमधील पोलादपूर इथल्या प्रचार सभेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर  (Pravin Darekar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो त्यांनी थोडी तरी जाणीव ठेवली पाहिजे, असा टोला मंत्री गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना लगावला आहे. तुम्ही कधीतरी अमावास्या पौर्णिमेला गावाकडे येता आणि काहीतरी सांगून जाता, यांना मुंबईत शोधायचं कुठं? असा सवालही गोगावले यांनी उपस्थित केलाय.आमच्यासाठी कुणी, किती काम केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असंही गोगावले यावेळी म्हणाले. त्यामुळे रायगडमध्ये (Raigad News) भाजप आणि शिवसेनेची चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आहे.

Continues below advertisement

Raigad News : लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं, रायगडमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीचा संघर्ष पेटला

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने सुनील तटकरे यांना केलेलं मतदान करूंन आम्ही पाप केलं असल्याचं विधान मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी केलंय. यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना एकटी लढत असून विरोधकांना प्रचार सभेतून विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. यावेळी त्यांनी मतदारांनी लोकसभेला राष्ट्रवादीला केलेल्या मतदानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे राष्ट्रवादीबरोबर आम्ही सोबत जाऊन पाप करून घेणार नाही, शिवाय यापुढे राष्ट्रवादीसोबत युती सुद्धा होणार नसल्याचं ठणकावून सांगितलं.

Continues below advertisement

Shivsena - NCP : रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला मोठा धक्का

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती शकुंतला टेंबे आणि माजी विभाग अध्यक्ष व ज्येष्ठ नेते राम टेंबे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने या मतदार संघात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे.

रायगडमध्ये शिवसेनेची पहिली उमेदवारी बिनविरोध 

रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिंदे शिवसेनेला शुभ संकेत मिळाला आहे. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडणून आले आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेने आपला पहिला बिनविरोध विजय मिळवत रायगडमध्ये जल्लोष केला. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढा भरवत आनंद साजरा केलाय.

हेही वाचा