Maharashtra Municipal Corporation Reservation 2026: राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. (Maharashtra Municipal Corporation Reservation 2026)

Continues below advertisement

50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे. (29 Municipal Corporation Reservation 2026 Marathi News)

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-

अनुसूचित जमाती - 1 अनुसूचित जाती - 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - 8 सर्वसाधारण - 17

Continues below advertisement

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण? (Municipal Corporation Reservation 2026)

अनु

महापालिका

महापौर आरक्षण

 

 

 

बृहन्मुंबई

सर्वसाधारण महिला

ठाणे

अनुसूचित जाती खुला

कल्याण-डोंबिवली

अनुसूचित जमाती खुला

नवी मुंबई

सर्वसाधारण महिला

वसई-विरार

सर्वसाधारण खुला

मिरा-भाईंदर

सर्वसाधारण महिला

उल्हासनगर

ओबीसी खुला

भिवंडी-निजामपूर

सर्वसाधारण खुला

पनवेल

ओबीसी खुला

१०

पुणे

सर्वसाधारण महिला

११

सांगली-मिरज-कुपवाड

सर्वसाधारण खुला

१२

कोल्हापूर

ओबीसी खुला

१३

पिंपरी-चिंचवड

सर्वसाधारण खुला

१४

सोलापूर

सर्वसाधारण खुला

१५

नागपूर

सर्वसाधारण महिला

१६

अकोला

ओबीसी महिला

१७

अमरावती

सर्वसाधारण खुला

१८

चंद्रपूर

ओबीसी महिला

१९

नाशिक

सर्वसाधारण महिला

२०

मालेगाव

सर्वसाधारण महिला

२१

धुळे

सर्वसाधारण महिला

२२

जळगाव

ओबीसी महिला

२३

अहिल्यानगर

ओबीसी महिला

२४

छत्रपती संभाजीनगर

सर्वसाधारण खुला

२५

लातूर

अनुसूचित जाती महिला

२६

नांदेड-वाघाळा

सर्वसाधारण महिला

२७

परभणी

सर्वसाधारण खुला

२८

इचलकरंजी

ओबीसी खुला

२९

जालना

अनुसूचित जाती महिला

मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना-

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के,  ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालं.

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...

BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती