Nishikant Dubey on Marathi: महाराष्ट्राबाहेर बिहार आणि उत्तर प्रदेशात मराठीवरुन दादागिरी करणाऱ्या लोकांना 'पटक पटक के मारेंगे', असे वादग्रस्त आणि मुजोर वक्तव्य करणारे भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांचा तोरा अद्याप कमी झालेला नाही. आपण या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचे निशिकांत दुबे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Marathi language Row)
महाराष्ट्राचं या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे, ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पण महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान आहे. याचं ठाकरे कुटुंबाशी, मराठी लोकांशी देणंघेणं नाही. तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटक कुठेही जा. तेदेखील 'पटक पटक के मारेंगे' म्हणतील. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले.
Mumbai Nishikant Dubey: निशिकांत दुबेंचा मुंबईतील खारमध्ये अलिशान फ्लॅट
मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात गरळ ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वत:चं काय आहे? इतरांच्या पैशांवर महाराष्ट्र जगतो असं म्हणणाऱ्या निशीकांत दुबे यांचा मुंबईतल्या खार पश्चिमला कोट्यावधींचा फ्लॅट आहे. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही, म्हणणारे खासदार दुबे स्वत:च मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत संचालक पदावर होते. राजकारणात जाण्यापूर्वी दुबे मुंबईस्थित असणाऱ्या बड्या कॉर्पोरेट कंपनीत ते डायरेक्टर पदावर होते.
1993 ते 2009 पर्यंत मुंबईत मुख्यालय असणाऱ्या स्टील, दूरसंचार, उर्जा या क्षेत्राशी संबंधीत काम करणाऱ्या कंपनीत दुबे यांनी व्यवस्थापनातील सर्वोच्च पद भूषवले होते. तसेच खार पश्चिमेला निशीकांत दुबे यांच्या नावावर उच्चभ्रु परिसरात 1680 स्के.फुटांचा कोट्यावधींचा फ्लॅट आहे.
Nishikant Dubey: महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता: निशिकांत दुबे
महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली होती.
आणखी वाचा