जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी 19 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार होते. त्या संदर्भात हमीपत्र देखील मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना दिलं होत. मात्र पोलिसांनी आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. मागच्या आंदोलनाचा दाखला देत आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. परवानगी नाकारल्यानंतर आता मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, आम्ही संविधानाप्रमाणे चालतो.सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेष भावनेने परवानगी नाकारली आहे. मुंबईत आंदोलन जरांगे करू शकतात असं न्यायालय म्हणत असताना यातून द्वेष उफाळून येत आहे, गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केलं. मिरवणूक गणेशोत्सवाची देखील होईल, ठरल्याप्रमाणे आम्ही उपोषण करू. आमचे वकील आजपासून कामाला लागतील, असंही पुढे जरांगेंनी म्हटलं आहे.(Manoj Jarange)

Continues below advertisement

वकील आता ठरवतील पोलीस आयुक्त यांच्याकडे जायचं की आणखी काय करायचं. पोलीस निरीक्षकांनी कायदा पायाखाली तुडवला आहे.सोयीनुसार कायदा चालवता येणार नाही.राज्य अस्थिर करण्याचं काम मुख्यमंत्री करत आहे. गेल्यावर्षी कायदा नव्हता का हे नवीन कायदा चालवणारे झाले का.? फडणवीस यांना न्यायदेवतेसह सगळ्यांचा अवमान करायचा आहे, राज्य दूषित करायचे आहे, आम्ही तर आदेश पाळून आंदोलन करणार आहोत, ही हुकूमशाही आणि गुंडगिरी आहे, मी तुम्हाला शरण येणार नाही, गुडघे टेकणार नाही आडमुठ्या सरकारचे धोरण आम्हाला मान्य नाही, तुम्ही असं करणार असाल तर आजपासून पाणी आणि औषधोपचार देखील मी बंद करत आहे, राज्य तुम्हाला अस्थिर करायचं आहे आम्हाला नाही, या सगळ्या गोष्टीला फडणवीस जबाबदार आहेत, असंही पुढे जरांगेंनी म्हटलं आहे.

कोर्टाचा दाखला देत आपलं हे आंदोलन आणि उपोषण जे आहे त्याला परवानगी नाकारलेली आहे. त्यांच्या मते, ही न्यायालयीन प्रक्रिया किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही ही परवानगी नाकारलेली आहे असं त्यांचं मत आहे. मग गेल्या वर्षी नव्हतं का गणेशोत्सव? तेव्हा कुठे गेले होते? तेव्हा कायदा नव्हता का? आताच नवीन हे कायदे चालवणारे झालेत का? गेल्या वर्षी आम्ही शांततेत राहिलो, सगळे नियम पाळून राहिलो, मग आता कस काय? फडणवीसांना सगळ्यांचा अपमान करायचाय, न्यायदेवतेचा पण करायचाय, न्यायाधीशांचा पण करायचाय. यांना कायदा यांच्या सोयीने चालवायचा आहे, यांना अराजकता माजवायची आहे, यांना राज्य अस्थिर ठेवायचं आहे, यांना वाद जाती-जातीमध्ये लावायचे आहेत, सण-उत्सवाच्या काळात राज्य दूषित करायचंय... आणि हे मुख्यमंत्रीच राज्य दूषित करतायत हिंदू सणावाराच्या दिवशी! आम्ही तर काय बाधा आणली नाही, आम्ही तर काही केलं नाही, आम्ही तर २९ ला तिथं जाणार आहे. आम्ही शांततेचा कुठलाही भंगही केला नाही, आम्ही न्यायालयाच्या अटी-शर्ती पाळून आंदोलन करणार आहे, असंही जरांगेंनी म्हटलं.

Continues below advertisement

याला जर तुम्ही रोखणार असाल तर हे राज्य कसले? मग हे संविधानाचं राज्य नाही, कायद्याचं पण राज्य नाही! इथं सरळ सरळ हुकूमशाही आणि गुंडगिरी चालली आहे. त्यांनी जे षड्यंत्र रचलंय ना, त्या दिशेने ते चाललेत; की याला काहीतरी उचापती करून, अडवून, याला गोळ्या घालून मारायचं. मी शरण जात नाही तुम्हाला! तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही. शान के साथ ठाम उभं राहून मी मरण पत्करायला तयार आहे, पण तुमच्यापुढे गुडघे टेकून शरण यायला तयार नाही! असलं कायदे चालवणारे मुख्यमंत्री, फडणवीसांसारखे मला मान्य नाहीत. न्यायदेवतेचे सगळे नियम आम्हाला मान्य आहेत, परंतु असल्या आडमुठ्या सरकारचे नियम आम्हाला मान्य नाहीत. १५ तारखेला आम्ही इथून जाणार! तुम्ही जर असं वागणार असला सरकार म्हणून जनतेशी महाराष्ट्रातल्या, न्यायदेवतेचा बी तुम्ही निर्देश अन् अपमान करता... आणि तुम्ही जर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेशी, गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करून असं वागणार, तर आम्ही सलाईन, पाणी हे सगळं बंद आजपासून! उपचार सगळं बंद, असंही पुढे जरांगेंनी म्हटलंय.

फडणवीसांना मरणच पाहिजे ना, तर असं मरण आलं तरी चालतंय, पण शरण मी तुम्हाला येत नाही! तुम्ही परवानगी नाकारून लोकांवरती अन्याय करणारा आणि राज्य अस्थिर करणारा... हे या राज्याला मान्य नाही. तुम्ही दलित, मुस्लिमांवर अन्याय करणार, तुम्ही आदिवासी, बंजारा समाजावर अन्याय करणार, तुम्ही धनगरावर, मराठ्यावर अन्याय करणार, तुम्ही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून काढणार... तुम्हाला राज्य अस्थिर करायचंय, याला सगळे जबाबदार आता फडणवीस साहेब आहेत, असंही पुढे जरांगेंनी म्हटलंय.