जालना : मराठा आरक्षणासंबंधित (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तब्येत आता बिघडली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटीला येण्यापूर्वी त्यांना उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर अभ्यासकांची चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये मराठी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे होते.

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसल्याचं दिसून येतंय. यावेळी ते भर उन्हात उपोषणाला बसले. त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळही त्यांच्या भेटीला आलं. मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. नंतर शिष्टमंडळातील नेत्यांनी सरकारशीही चर्चा केली.

दरम्यान, शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांशी चर्चा केली. त्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यासकांनी त्यांची मतं व्यक्त केली. ते सर्व मुद्दे राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवले. 

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation Protest : पहिल्या दिवशी काय झालं? 

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये विना मंडप, विना कुलर कडक उन्हात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंचं हे उपोषण लवकरात लवकर थांबावं यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड, नव्या मसुद्यासह जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत. मात्र जरांगेंनी हा मसुदा अमान्य करत, शिष्टमंडळाला माघारी पाठवले. त्यानंतर अंतरवली गावातील सरपंच पांडुरंग तारख यांच्या घरी अभ्यासक यांच्या सोबत विखे पाटील, लाड यांची बैठक सुरू झाली. 

आरक्षणाच्या लढ्यातलं मनोज जरांगेंचं हे नववं उपोषण आहे. दरवेळी आमरण उपोषण करणारे जरांगे यावेळी थेट रणरणत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. उपोषणासाठी जरांगेंनी कोणताही मांडव टाकलेला नाही. केवळ एका बाजेवर बसून जरांगेंनी सरकारकडे त्यांच्या मागण्या लावून धरल्या आहेत.

त्याचवेली मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड जरांगेंची समजूत काढण्यासाठी मराठवाड्यात ठाण मांडून बसले आहेत. उपोषणाच्या आदत्या दिवशीच्या संध्याकाळपासून जरांगेंची समजूत काढण्यासाठी हे दोन्ही नेते दाखल झाले. मात्र, पहिल्या दिवशी जरांगेंची समजूत काढण्यात त्यांना यश आलं नाही. 

आता सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी एक विशेष मसुदा तयार केला आहे. हा मसुदा जरांगे मान्य करणार की आंदोलन तसंच सुरू ठेवणार हे येत्या काही वेळात स्पष्ट होणार आहे.

Manoj Jarange Patil Demands : मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय? 

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

ही बातमी वाचा: