जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता जरांगे पाटील (Manoj Jarange) जे काही करतील ते शांततापूर्वकच करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांचा भाऊ शांतता राखूनच काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर उपाय शोधला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यावरी आज मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अमृता ताईंना शब्द दिला. आम्ही शांततेनच आंदोलन करणार, त्या खुन्नसने बोलल्या नाहीत, आम्ही भाऊबिजेला त्यांच्याकडे जाऊ, त्यांनी टोमणा मारला नाही. त्यांनी खुन्नस देऊन बोलले नाही, अमृता ताईंना आमचा शब्द आहे, आंदोलन शांततेच होणार आहे. (Manoj Jarange)
माय माऊलीची शब्दाची भावना आम्हाला कळते. तेवढे चांगलं संस्कार आमच्यावर आहेत. हे उपोषण 29 ऑगस्ट पासून कायम चालू असून मुंबईपर्यंत चालणार आहे, मी थकलोय ही शेवटची लढाई आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, सलाईनवर जगत आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे. तर विखे पाटलांबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुमच्या भावनेचा आदर करूनच वर्षभर वेळ दिला. तुम्ही समाजाचा खूप नुकसान केलं. मराठ्यांचा अपमान ठरवून तुम्ही केला. शिष्टमंडळ मराठ्यांना भेटायला जाणार नाही म्हणून तुम्ही मराठ्यांचा अपमान केला. आता मराठे तुम्हाला मतदानच करणार नाहीत. 58 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रद्द तुमच्या काळात होऊ लागले, असंही जरांगेंनी म्हटलं आहे. (Manoj Jarange)
“हिंदू धर्माचे सण आमच्या इतके कोणी करत नाही’
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उदय सामंत साहेब काय म्हणाले मला माहिती नाही. परंतु गणेशोत्सव जरी असला तरी गेल्या वर्षी पण होता. आम्ही हिंदू धर्माचे सण आमच्या इतके कोणी करत नाही. त्यामुळे सण आमचा आहे. मागणी आमची आहे. कुठेही अडथळा येणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा आला नाही. मग तुम्ही वर्षभर काय केलं? गेल्या वर्षभरापासून आम्ही तुम्हाला संधी दिली. तुम्हाला वेळ दिला. लाडभाऊ आल्यापासून सहा महिने झालेत आमच्या आरक्षणाच्या लढ्याच्या प्रकरणात आले आहेत. तेव्हा पासून वेळ दिला. त्याच्यानंतर विखे पाटील हे सगळे आले. मे पासून तीन महिने दिले आणि तुम्हाला आता आजपासूनही आठ दिवस संधी आहे. चूक कोणाची? माझी काय चुकी आहे? माझ्या मराठ्या समाजाच्या लेकरांना मी आरक्षण नाही मागायचं का? मी झुंजायचं नाही का? संधी देऊन तुम्ही चुका करणार आणि म्हणणार मुंबईला येऊ नका. असं कसं होईल. आम्ही तुम्हाला तीन वर्ष संधी दिली. 29 ऑगस्ट 2023 पासून संधी दिली.
