एक्स्प्लोर

हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...

आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

जालना: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. तसेच, शिंदे समिती पुन्हा एकदा अंतरवालीत दौरा करणार असून चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले. दरम्यान, यावेळी, राधाकृष्ण विखे पाटलांनी नाव न घेता थेट शरद पवारांकडे (Sharad Pawar) बोट दाखवलं. 1994 साली मंडल आयोगात हे टाकलं असतं तर आज ही वेळ आली नसती, हे सगळं त्यांचं पाप आहे, असेही विखे पाटलांनी म्हटले. त्यावर, आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. 

शासनच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनीही आपली भूमिका मांडली. आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तसेच, विखे पाटील आणि सावंत डोक्यावर पडले आहेत का? गोळ्या सुरू आहेत का त्यांना? चांगला रिस्पॉन्स कसा असतो नरड्यात हात घालायचा का तुमच्या? आम्ही तुम्हाला येऊ नका म्हणलो का? असे म्हणत सरकारच्यावतीने जी बोलणी सुरू आहेत, त्यावरही जरांगे पाटलांनी भाष्य केलं. तुम्हाला यायचं असेल तर सगळे जीआर काढून या, असेही पाटलांनी म्हटले. 

तुम्हाला तेच भांडण लावायचंय

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाव न घेत शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उल्लेख करण्यात आला होता. तसेच, 1994 सालच्या मुख्यमंत्र्‍यांचं हे पाप आहे,असेही विखे पाटलांनी म्हटले होते, त्यावरूनही जरांगे पाटलांनी सुनावलं. तुम्हाला तेच भांडण लावायचं आहे शरद पवार होते आणि कोणी होतं. त्यांनी वाटोळ केलं आमचं, तुम्ही काय कमी केलं का? असा सवाल जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला. तसेच, आता तू शिफारस कर, तू मराठ्याचा देव, लोकाकडे कशाला बोट दाखवतो. आता, 12 तारखेपर्यंत वाट बघणार आहे, असे म्हणत विखे पाटलांवरही जोरदार हल्लाबोल केला. 

विखे पाटील नेमकं काय म्हणाले

येत्या 10 सप्टेंबर ते  17 सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात ज्यांनी अर्ज केला आहे, त्याबाबत कार्यवाही करु असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil )  म्हणाले. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांना ( Sharad Pawar)  टोला लगावला. 1994 ला मंडल आयोगात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर हा इतिहास घडला नसता. 1994 साली जे मुख्यमंत्री होते हे त्याचं पाप आहे असा टोला विखे पाटील यांनी पवारांना लगावला. मात्र आम्ही आता प्रयत्न करतोय असे विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा

हे पाप शरद पवारांचे, 1994 ला निर्णय घेतला असता तर... मराठा आरक्षणावरुन विखे पाटलांचा पवारांना टोला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget