'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला ओबीसींचे 1 टक्का आरक्षण नको आहे. ज्यांच्या नोंदी निघत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे आणि याला ओबीसींचा देखील विरोध नसला पाहिजे.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, "रद्द झालेली चार प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही," असा इशारा सरकारला दिला. सध्या फक्त पाणी पिऊन आणि सलाईन लावून आंदोलन सुरू ठेवणार असून सरकारला ४ दिवसांची मुदत दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसाद लाड साहेब खूप तळमळ करत आहेत, पण आपले आरक्षण फक्त 'श्रेयात' गुंतले आहे. त्यामुळे आपल्याला आता वेगळी आणि कठोर लढाई करावी लागेल, असे ते म्हणाले.
आम्हाला ओबीसींचे 1 टक्का सुद्धा आरक्षण नको
जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला ओबीसींचे 1 टक्का आरक्षण नको आहे. ज्यांच्या नोंदी निघत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे आणि याला ओबीसींचा देखील विरोध नसला पाहिजे. उद्या जर हैदराबाद गझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर आम्ही फुले उधळू. सातारा आणि कोल्हापूर गझेटियरनुसार सरकारने तात्काळ जीआर काढावा आणि त्याची अंमलबजावणी 3 महिन्यांनंतर करावी. चार रद्द झालेले प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, "विखे पाटील कधीच खरे बोलत नाहीत, ते काहीतरी शाळा करत आहेत आणि शिंदे-फडणवीस यांच्यात भांडण लावत आहेत. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक शत्रूत्व नाही, पण ते नेहमी खोटे बोलतात."
नाहीतर मंत्री आले तरी मी मोजत नाही
प्रसाद लाड यांना म्हणाले की, "मी फक्त तुमच्या शब्दाचा मान ठेवून उठून बसलो आहे, नाहीतर मंत्री आले तरी मी मोजत नाही," असे सांगत जरांगे यांनी मुंबईत येऊन बाकीच्या गोष्टी नीट करण्याचा इशारा दिला. चार दिवसांची वेळ देऊन पाणी पिणे व सलाईन लावणे सुरू राहील, पण उपोषण पूर्णपणे सुटणार नाही आणि प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले. जर लोकांनी स्वतः अर्ज केले नाहीत तर त्यात तुमचा किंवा आमचा दोष नाही, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?





















