Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil: विखे पाटील आणि सावंत डोक्यावर पडले आहेत का? त्यांना गोळ्या सुरू आहेत का? अशी सुद्धा विचारणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी यांना दंगलीच घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप करत शिंदे आणि फडणवीस यांना सुद्धा ठेवायचं नसल्याचे म्हटलं आहे. मला सगळ्या चालबाज विखे पाटील दिसू लागला आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी तोफ डागली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावरूनही मनोज जरांगे पाटील यांनी तोफ डागली आहे. ते म्हणाले की आपल्या वाट्याला गेल्यास आपण सोडत नाही, मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा दादा असतील. विखे पाटील आणि सावंत डोक्यावर पडले आहेत का? त्यांना गोळ्या सुरू आहेत का? अशी सुद्धा विचारणा जरांगे पाटील यांनी केली आहे.
उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरू
दरम्यान, जरांगे पाटील यांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षांमध्ये कधीही आपल्यासोबत चर्चेसाठी जिल्हाधिकारी, एसपी आले नाहीत. हे उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरू असल्याचाही जरांगे पाटील यांनी आरोप केला. ते म्हणाले की आमच्याकडे मसुदा पाठवला आहे मात्र आम्ही सांगितलं आहे की या सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा. दुसरीकडे हे आंदोलन मोडून काढण्याचा डाव असल्याचा सुद्धा आरोप जरांगे यांनी केला. त्यांनी सांगितलं की मराठे चवताळले तर तुम्हाला सुद्धा हाताखालून काढतील. इकडे मरण्यापेक्षा जातीसाठी मरू, जातीसाठी मेल्यावर शहीद होऊ, अशी असं सुद्धा जरांगे म्हणाले. ते म्हणाले की जातीसाठी मरायचं नाही तर मग दारू पिऊन मरायचं का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सुद्धा काठीच्या बदल्यात काठी घेणार असल्याचंही ते म्हणाले. तुम्ही एक माणूस मारला तरी आम्ही सुद्धा एखादा तरी मारूच, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आपण सर्व ओबीसी, मराठे, मुस्लिम मिळून यांना उखडून काढू, हे सत्तेत नको, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. कोल्हापूर, सातारा संस्थानांच्या जीआर द्यावा, असंही मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली. दरम्यान त्यांनी 12 सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक





















