एक्स्प्लोर

Manoj Jarange : नाते, रक्ताचे नाते अन् कुळ.... सरकार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तयार; मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई कामाला, जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन 

Manoj Jarange Maratha Protest : ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करावेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रं देण्यात येतील असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. 

Manoj Jarange Maratha Protest : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांची शिष्टाई कामाला आली असून उद्यापासून (4 सप्टेंबर) कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन मराठा समाजाला करण्यात आलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी नातं, रक्ताचं नातं आणि कुळ या मुद्द्यांच्या आधारे अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं. मंत्र्यांना मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही, एकाच्या ठिकाणी दोन सलाईन लावून घेतो, पण उपोषण मागे घेणार नाही. मी जर असं केलो तर मराठा समाजाचं वाटोळं होईल, ते मला होऊ द्यायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांना जर मराठा समाजाला साथ द्यायची असेल तर मनापासून साथ द्यावी, असंही जरांगे म्हणाले. 

मराठा समाज्याच्या ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व्हॅलिडिटी देण्यासोबत इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे गेल्या सहा दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गटाने विचार केला आणि ते मनोज जरांगेंच्या भेटीला आले. या मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे. 

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, जरांगेंचं आवाहन

हैदराबाद गॅझेटनुसार ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व्हॅलिडिटीसाठी अर्ज करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 5 सप्टेंबर पर्यंत ग्रामपंचायतींमध्ये नोंदीची यादी लावण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार असून त्यामध्ये काही अडचणी आल्या तर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. 

हैदराबाद गॅझेटनुसार 4 सप्टेंबरपासून मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. तसेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचाही जीआर सरकारने काढावा अशी मागणी जरांगे यांनी मंत्र्यांकडे केली. मंत्रालयात आरक्षण कक्ष नको तर मराठा-कुणबी कक्ष स्थापन करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 

कोणत्याही मराठा विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही. जात पडताळणीमुळे विलंब झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क परत दिले जाणार, असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. दर मंगळवारी मराठी उपसमितीची बैठक होते, त्यामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवले जातील, असंही विखे पाटील म्हणाले. 

संजय शिरसाटांवर टीका

मराठा समाजातील मुलांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यामागे संजय शिरसाट यांचा हात असल्याचा आरोप या आधी मनोज जरांगे यांनी केला होता. आताही संजय शिरसाटांच्या नावाचा उल्लेख जरांगे यांनी केला. शिरसाटांनी काय केलं आहे हे माझ्या लक्षात आहे, त्याचं कसं कांड करतो हे बघाच, असं मनोज जरांगे म्हणाले. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget