जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही, असं जरांगे यांनी म्हटलं. उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल, असं मनोज जरांगे म्हणाले. मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.   

Continues below advertisement

रखरखत्या उन्हात आंदोलन : मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 10 महिने वेळ दिल्याचं सांगितलं. माझा नाईलाज आहे,मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. मी सीमारेषेवर आलेलो आहे, 30 मे चं आमरण उपोषण ठरवलं आहे, त्यात बदल केला आहे. आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये  आपण ते करत होतो, सगळे तसेच करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असं मनोज जरांगे म्हणाले.  माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, या जीवाला तरसाचं किती दिवस,  जे काही होईल ते होईल, उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची, असं मनोज जरांगे म्हणाले. 

आमरण उपोषण कुठेही होईल, जंगलात होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे. किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलं आहे. सारखी सारखी उपोषणं करुन जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडूदेत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल. हे आंदोलन सुरु आहे त्याला तीन वर्ष झालेत. मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करायला वेळ का लागतोय : मनोज जरांगे

माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा होतोय, ते  कुठेतरी थांबलं पाहिजे. आमरण उपोषण फायनल झालं आहे, यात बदल होणार नाही. मराठा समाजानं अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असंही मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे.  देशात इतकं टोकाचं आमरण उपोषण झालं असेल असं वाटत नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं. 

प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील  येणार की नाही हे मला माहिती नाही. 29 ऑगस्ट पासून उद्या पर्यंत 10 महिन्याचा वेळ दिला आहे.  हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? व्हॅलिडिटी देणार आहात का? मराठ्यांची मतं पाहिजेत,मात्र, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका आहे. तुम्हीच आमच्यावर हल्ले करायचे, आमच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला जातो. राज्यातील गुन्हे मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस आमच्यावर हल्ले करणार त्यांच्यावर 120 ब लागून 307 दाखल करत  नव्हता.सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला, 10 महिने जीआर काढत नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

आमचा 5 पिढ्यांचा बॅकलॉग  कोण भरून काढणार 

मनोज जरांगे यांनी आमचा 5 पिढ्यांचा बॅकलॉग  कोण भरून काढणार असा प्रश्न उपस्थित केला.मला आर पार खेटायचे आहे.मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात आंतरवाली सराटी मध्ये 30 मे पासून बसणार आहे. एवढे क्रूर सरकार आतापर्यंत जगात आले नसेल.या महाराष्ट्रावर आम्ही विश्वास टाकला, विना अट आम्ही सहभागी झालो, असं जरांगे म्हणाले.अजित दादा शिंदेसाहेबांचे मंत्री टार्गेट केले जात आहेत. तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी देखील येत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देतील पण त्यांना फक्त आवडत्या मंत्र्यानाच भेटायचे का?त्यांचा बाईट ऐका यांच्यातून प्रसाद लाड यांचे डोळे उघडतील.तुझा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे. लाड यांचे डोळे उघडले असतील. फडणवीसांना आम्ही शत्रू मनात नाहीत, भाजप मधले मंत्री आमदार समजून घ्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. प्रसाद लाड यांना मनातले मनात तरी कळले असेल आपलाच माणूस कामाचा नाही, अशी टीका देखील जरांगे यांनी केली. 

मराठा समाजाने आंतरवाली मध्ये येऊ नये. कोणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही, मी समाजाच्या लेकरासाठी मारायला तयार आहे. मी वेळ प्रसंगी प्राण टाकायला तयार आहे. मला चर्चा नको, अंमलबजावणी हवी, कोणी येईल नाही येईल आमच्यात क्षमता आहे. आमच्याकडे कोणी यावे म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. आम्हाला लढावे लागते. आम्ही उरलेल्या पिठावर जगणारे नाहीत, स्वतःच्या क्षमतेवर राज्य राज्य करणारे आहोत, असं मनोज जरांगे यांनी टीका केली आहे.  आम्ही देणारे आम्ही राज्यात एकटेच 55 टक्के आहोत.मुख्यमंत्री आपल्या जातीचा नसून आरक्षण दिले. पण तो आपल्या जातीचा नसून त्याला मराठ्यांनी मुख्यमंत्री केलं, हे कसे काही जणांना कळत नाही, असं देखील मनोज जरांगे म्हणाले. 

मनोज जरांगे प्रसाद लाड यांना उद्देश म्हणाले की उदय सामंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना न सांगता आले असे म्हणलात. मित्र मित्राला सांगून येतो का,तुम्ही त्यांना नोकर ठेवले का त्यांना स्वातंत्र्य नाही का. हे लोक माणसांच्या समस्या जाणून घेतात. नारायण राणे अशोक चव्हाण यांना का बोलावले नाही म्हणतात. माणसे माणसावर घालण्याच यांचे काम आहे. नारायण राणे तुमच्यात आले नसते तर तुमचा देव्हारा झाला असता. किरीट सोमय्या चा सुद्धा वापर केला. सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्रम केला,नितीन गडकरी यांचा पचका केला, अशी टीका जरांगे यांनी केली.