एक्स्प्लोर

Manoj Jarange : मंत्री म्हणाले, सगळं मान्य पण उपोषण मागे घ्या; जरांगे म्हणाले, यापुढे उपोषण केलो तर मरून जाईन...

Manoj Jarange Maratha Protest : ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी 4 सप्टेंबरपासून अर्ज करावा, त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील असं आवाहन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलं. 

जालना : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यास मंत्र्यांच्या गटाला सध्यातरी अपयश आल्याचं चित्र आहे. उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी सातत्याने विनंती केली. परंतु, जरांगे मात्र उपोषणावर ठाम राहिले. 11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतर उपोषण मागे घेतो असं जरांगे म्हणाले. 

यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं जरांगे म्हणाले. मंत्र्यांच्या शब्दाला मान देतो, एकाच्या ठिकाणी दोन सलाईन लावून घेतो, मात्र सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाच्या ज्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. जरांगे हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये आलं. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. 

मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या या शिष्टमंडळाने मान्य केल्या असून 4 सप्टेंबरपासून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. ज्यांना अडचणी येतील त्यांनी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. 

मंत्र्यांची विनंती, मात्र जरांगे उपोषणावर ठाम

अंतरवालीत आलेल्या मंत्र्यांनी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य असून त्यावर आम्ही काम करू असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं. मात्र जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. 

हे माझे शेवटचे उपोषण आहे. यापुढे शरीर साथ देणार नाही. पुन्हा आंदोलन केलो तर मरून जाईन, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे याच वेळी मराठा समाजाच्या सगळ्या मागन्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले. 11 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला वेळ देतो. तोपर्यंत मी एक नव्हे तर दोन सलाईन लावून घेतो. परंतु, 11 सप्टेंबरपर्यंत जर आमच्या मागण्या अंमलात आणल्या नाही तर 12 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करणार असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. 

राज्याचे मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "न्यायमूर्ती शिंदे समिती कडून 58 लाख नवीन नोंदी शोधल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने हे यश मिळाले. जात प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहे. मंत्रालयात  मराठा आरक्षण कक्ष तयार करण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने काम केले या पूर्वी कोणत्याच मुख्यमंत्र्याने काम केले नाही. 1994 साली, मंडल कमिशनच्या वेळी मराठा समाजाला ओबीसीमध्ये न समाविष्ट करता आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कोणी पाप केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे."

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 
Advertisement

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Embed widget