एक्स्प्लोर

Manikrao Kokate : ओसाड गावची पाटीलकी, 'त्या' विधानावरून शेतकरी अन् कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये जोरदार बाचाबाची; NDCC च्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate : शेतकऱ्यांकडून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाची आठवण करून देण्यात आली. यानंतर माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये काही बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

Manikrao Kokate : कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर शेतकऱ्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. आता शुक्रवारी (दि. 04) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC Bank) विशेष सर्वसाधारण सभेत देखील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विधानाचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या विधानाची आठवण करून देण्यात आली. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये काही बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत ठेवीदार शेतकरी आणि बँकेचे प्रशासक समोरासमोर आले. सभा सुरू होताच शेतकरी प्रतिनिधी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रतिनिधींच्या बेकादेशीर निवडीबाबत शेतकरी प्रतिनिधी चांगलेच आक्रमक झाले होते. या सभेला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच विकास शेतकरी संघटनेचे सदस्य आणि इतर शेतकरी सभासदांनी रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी थेट विचारले की, माणिकराव कोकाटे साहेब निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफी जाहीर केली होती. पण निवडणुका झाल्यानंतर शेतकरी अजूनही आशेवर जगतो आहे," असे म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

बँकेतील गैरव्यवहारावर संताप

शेतकऱ्यांनी आरोप केला की, "जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीमुळे बँक अडचणीत आली आहे. नोटबंदी काळात 10 टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून देण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार?" मोठे थकबाकीदार आहे, त्यांची वसुली केव्हा होणार?  संचालक मंडळ आणि जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना चाप कधी बसणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. 

कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी

शेतकरी संघटनांनी ठामपणे सांगितले की, सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यामुळे कोणताही शेतकरी कर्ज फेडत नाही. "म्हणून कृषीमंत्री कोकाटे यांनी या सभेतच ठराव करावा की, कर्जमाफी दिल्यास शेतकरी कर्ज फेडायला तयार होतील."

कर्ज वसुलीसाठी सामोपचार योजना; सभासदांचा विरोध

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी सामोपचार योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सभासदांनी या योजनेला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत कोकाटेंना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभागृहात वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शांततेचे आवाहन केले. "सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अडचणी दूर करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील," असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

‘ओसाड गावाची पाटीलकी’ विधानावरून बाचाबाची

या सभेत शेतकऱ्यांनी मंत्री कोकाटेंना त्यांच्या ‘ओसाड गावाची पाटीलकी’ या जुन्या विधानाची आठवण करून दिली. यावरून काही काळ शेतकरी व मंत्र्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सामोपचार कर्ज वसुली योजना जिल्हा बँकेने सर्वानुमते मंजूर केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंजुरीची घोषणा केली. 

आणखी वाचा

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : इकडं मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार, तिकडं नाशिकमध्ये मनसे अन् ठाकरे गटाची मेळाव्यासाठी 'युती'; दोन्ही पक्षाचे नेते सोबत मुंबईत धडकणार

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, जे.पी. नड्डा फक्त 10 मिनिटं भेटले
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, जे.पी. नड्डा फक्त 10 मिनिटं भेटले
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Embed widget