Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Mangesh Chivte Pune Teachers Constituency Election 2026: पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्या प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केला, तरीही चिवटे मैदानात

Mangesh Chivte Pune Teachers Constituency Election 2026: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या पुणे शिक्षक मतदार संघाची (Pune Teachers Constituency) जागा अखेर भाजपला सुटली आहे. भाजपने कौस्तुभ गावडे (Kaustubh Gawde) या आपल्या उमेदवाराची घोषणा देखील केली. मात्र, उद्या एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे (Mangesh Chivte) हे शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत असणार असल्याची चर्चा असतानाच चिवटे यांचे सुरुवातीपासून समर्थन करणाऱ्या शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आमचा काही संबंध नसेल असा खुलासा केल्याने चिवटे यांना उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra Politics news)
वास्तविक पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन जागांपैकी एक जागा शिवसेनेला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही जागा भाजपला सुटल्याने हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. आता मंगेश चिवटे जरी उमेदवारी दाखल करणार असतील तरी त्यात आमचा काही संबंध नसेल आणि आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायला ही सोबत असणार नाही. आमचा पाठिंबा मंगेश चिवटेंना नव्हता तर शिवसेनेला आहे, अशा स्पष्ट शब्दात आज शहाजी बापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांना फटकारले आहे. त्यामुळे आता मंगेश चिवटे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Eknath Shinde and PM Modi: एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन मोदींना भेटणार
पुण्यातील विधान परिषदेची एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्याने एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी एक वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते पंतप्रधान मोदींना भेटतील, असे सांगितले जात आहे. या भेटीत पुणे विधान परिषदेच्यादृष्टीने काही चर्चा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या भेटीवर मंगेश चिवटे यांचे भवितव्य अवलंबून आहे.
आतापर्यंत कोणीकोणी उमेदवार जाहीर केले, संपूर्ण यादी- (Maharashtra Vidhan Parishad Election Candidate List)
Pune Election 2026: पुणे पदवीधर
- भाजप- डॉ. स्मिता जाधव (अधिकृत उमेदवार)
- राष्ट्रवादी-सुनील टिंगरे (इच्छुक)
- राष्ट्रवादी श.प. भैया माने (इच्छुक)
Pune Election 2026: पुणे शिक्षक-
- भाजप- कौस्तुभ गावडे (अधिकृत उमेदवार)
- शिवसेना- मंगेश चिवटे (इच्छुक)
- काँग्रेस- जयंत आसगावकर (अधिकृत उमेदवार)
Nagpur Election: नागपूर पदवीधर-
- भाजप- सुधाकर कोहळे (अधिकृत उमेदवार)
- भाजप-अनिल सोले (इच्छुक)
- काँग्रेस-अभिजीत वंजारी (अधिकृत उमेदवार)
Amravati Election: अमरावतीशिक्षक-
- काँग्रेस-अदिती पोहरे (अधिकृत उमेदवार)
- शिवसेना ठाकरे गट- दत्तात्रय लहाने (अधिकृत उमेदवार)
- शिवसेना- किरण सरनाईक (इच्छुक)
- शिवसेना- श्रीकांत देशपांडे (इच्छुक)
- भाजप संगीता शिंदे (इच्छुक)
- भाजप- शेखर भोयक (इच्छुक)
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरपदवीधर-
- मराठवाडा शिक्षक संघ- सुशील घोटे-पाटील (अधिकृत उमेदवार)
- राष्ट्रवादी- सतिश चव्हाण (अधिकृत उमेदवार)
- राष्ट्रवादी श.प.-प्रतापसिंह पाटील (इच्छुक)
- शिवसेना ठाकरे गट-दिलीप घुगे (इच्छुक)
आणखी वाचा






















