कोलकाता : सत्ता गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे, ममता बॅनर्जी यांच्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्याचवेळी दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या चार टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

Continues below advertisement

Ritabrata Banerjee Group : बंडखोर गटाला अध्यक्षांची मान्यता

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पश्चिम बंगालचे राजकारण चांगलंच तापलं आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूलमधून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रत बनर्जी यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पक्षाच्या 80 पैकी 60 खासदारांनी ऋतब्रत बनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनीही मंजुरी दिली आहे.

पक्षाच्या 80 पैकी 60 आमदारांनी ऋतब्रत बनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडे 20 आमदार उरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षदेखील फुटणार हे स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement

दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हेदेखील चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतंय. अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. ईडीच्या चार टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून आता त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

विधानसभा अध्यक्षांची ऋतब्रत बनर्जी यांच्या गटाला मान्यता

पश्चिम बंगालच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ऋतब्रत बनर्जी आणि संदीपन शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर पक्षातील वाद आणखीनच चव्हाट्यावर आला, ऋतब्रत बनर्जी आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 

ऋतब्रत बनर्जी यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 58 आमदारांच्या सह्यांचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं. त्याचवेळी आणखी दोन आमदार, असे 60 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. ऋतब्रत बनर्जी यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी या बंडखोर गटाला मान्यता दिली. त्याचेवेळी ऋतब्रत बनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणूनही मान्यता देण्यात आली.  

पश्चिम बंगालमधील पक्षीय बलाबल - 294

भाजप - 207तृणमूल काँग्रेस - 80डावे - 2काँग्रेस - 2इतर - 2

ही बातमी वाचा :