एक्स्प्लोर

Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind: माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, कायद्याची पदवी मिळवली, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?

Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind Nihal Ahmed: शान ए हिंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले.

Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind Nihal Ahmed: मालेगाव महानगरपालिकेत (Malegaon Municipal Corporation) नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच शहरातील राजकारण तापले आहे. मालेगाव महापालिकेत समाजवादी पार्टीच्या उपमहापौर शान ए हिंद (Malegaon Deputy Mayor Shan E Hind) यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या दालनात लावला. यानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या छायाचित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले. अनेकांनी या कृतीवर तीव्र टीका करत उपमहापौरांवर निशाणा साधला. शान ए हिंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले. पण शान-ए-हिंद नेमक्या कोण आहेत?, जाणून घ्या...

कोण आहेत शान-ए-हिंद? (Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind Nihal Ahmed)

- मालेगाव महापालिकेत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत..
- शान-ए-हिंद या मालेगावच्या विद्यमान उपमहापौर आहेत.
- जनता दलाचे दिवंगत नेते व मालेगावचे सात वेळचे आमदार निहाल अहमद यांच्या त्या कन्या आहेत.
- निहाल अहमद यांनी अनेक दशके मालेगावच्या राजकारणावर आपली पकड ठेवली होती.
- 2002 मध्ये मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर निहाल अहमद हे पहिले महापौर होते.
- मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, सात वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली. एस. एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
- त्याआधी शान-ए-हिंद यांच्या मातोश्री सजेदा निहाल अहमद यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते.
- शान ए हिंद यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.
- शान-ए-हिंद यांना त्यांचे बंधू बुलंद इक्बाल यांच्याबरोबर कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्यासाठी तयार करण्यात आले..
- मात्र, वडील आणि भावाच्या अकाली निधनानंतर त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या.
-  त्यांनी मालेगावच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
- 2023 मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शान-ए-हिंद यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
- 2024 मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- महापालिका निवडणुकीपूर्वी शान-ए-हिंद यांच्या पतीने अनेक वर्षांचे वैर बाजूला सारून माजी आमदार शेख आसिफ यांच्या 'इस्लाम' पक्षाशी हातमिळवणी केली.
- मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी इस्लाम पक्षाबरोबर आघाडी केली.
- महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी व इस्लाम पक्षाच्या आघाडीने एकूण 40 जागांवर विजय मिळवला.
 - शान-ए-हिंद यांच्यासह त्यांचे पती मुश्तकिम डिग्निटी या दोघांसह समाजवादीचे पाच नगरसेवक निवडून आले.
- शान ए हिंद यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला.
 - मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले.

संबंधित बातमी:

Malegaon Tipu Sultan Photo Row: उपमहापौरांच्या दालनात झळकला टिपू सुलतानचा फोटो; शिवसेना-हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात राजकारण तापलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
Rohit Pawar: 'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Embed widget