Malegaon karkhana Election result: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, रंजन तावरेंचा 362 मतांनी पराभव, माळेगाव कारखान्यात अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?
Malegaon karkhana Election result: अजित पवार यांच्या 500 कोटींच्या घोषणेचा परिणाम झाला, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना 21-0 ने व्हाईटवॉश देणार?

Malegaon sugar factory election result 2025: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला (Malegaon Election Result) निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली होती. मंगळवारी फक्त पहिल्या फेरीची मतमोजणी पार पडू शकली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाली. आज सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीच्या कलांनुसार माळेगाव साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याच निलकंठेश्वर पॅनेलची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे.
फक्त दोन जागा वगळता इतर कोणत्याही जागेवर अजित पवारांच्या पॅनेलसमोर विरोधी उमेदवारांचा निभाव लागू शकला नाही. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलसमोरील मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे हेदेखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत त्यांचा 362 मतांनी पराभव झाला आहे. रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनेलचे नेृतृत्त्व केले होते.
ताज्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याच्या 21 जागांपैकी 19 जागांवर अजितदादांच्या निलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांची विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु आहे. तर फक्त दोन जागांवर सहकार बचाव पॅनेलकडून अजितदादांच्या पॅनेलला कडवी टक्कर मिळत आहे. यापैकी एक जागा सांगवीची असून येथून चंद्रकांत तावरे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या जागेवर जीबी गावडे हे आघाडीवर आहेत. मात्र, अजितदादांच्या पॅनेलचा रेटा पाहता या दोघांचा विजयही अद्याप निश्चित मानला जात नाही. त्यामुळे अजित पवार आता माळेगावच्या निवडणुकीत विरोधकांना 21-0 असा व्हाईटवॉश देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडले होते. या निवडणुकीसाठी अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, अशी चार पॅनेल रिंगणात होती.
आणखी वाचा
माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का, बळीराजा पॅनलच्या उमेदवाराला 7,722 पैकी फक्त 251 मतं
सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला
























