Malegaon Election 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर (Malegaon Sahakari Sakhar Karkhana Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. तर सहकार बचाव पॅनलला फक्त एक जागा जिंकता आल्या आहेत. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
शरद पवार पॅनेलचा सुपडा साफ-
शरद पवारांच्या बळीराजा सहकार बचाव आणि कष्टकरी शेतकरी पॅनलचा सुफडा साफ झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जवळपास 35 तास चालली. माळेगाव कारखाना निवडणूक यावेळी खूपच चर्चेत आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या निवडणुकीत स्वतःला चेअरमनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष गेले.
कोण आहेत चंद्रराव तावरे?
1) अजितदादांच्या पॅनेलची मुख्य लढत चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलसोबत होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या टीममध्ये एकेकाळी काम केलेले चंद्रराव तावरे आहेत.
2) वयाच्या 85 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात असलेले चंद्रराव अण्णा तावरे यांचे सर्व पॅनेल जवळपास पराभूत झाले. मात्र लोकांनी चंद्रराव तावरे यांना स्वीकारले. समोर अजितदादा यांच्या पॅनेलचे तगडे आव्हान असतानाही अण्णा त्या वादळात विजयी झाले.
3) सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असताना पहिल्या फेरीपासून चंद्रराव तावरे आघाडीवर होते आणि त्यानंतर त्यांना विजयी घोषित केले.
Malegaon Sugar Factory Result Winning Candidates List : निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवारब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव 8) राजेंद्र बुरुंगले9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप11) तानाजी कोकरे12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे
