Malegaon News : मी टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचा दालनात फोटो लावल्याने त्यांचे महान कार्य अनेकांना कळाले. टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख हे ब्राह्मण होते. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे, हे भाजपला माहितच नाही. संविधानात ज्यांचा फोटो आहे तो हटविण्याचा अधिकार भाजप व इतरांना कोणी दिला? असा सावलकरत मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद (Deputy Mayor Shan E Hind) यांनी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्याटीकेलाप्रत्युत्तरदिलंय. (Tipu Sultan Photo Controversy)

Shan E Hind : मी ओबीसी वर्गातून आलीय म्हणून मला टार्गेट केलंजातंय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान (Tipu) प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी टिपू सुलतानी तुलना शिवजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहिती दिली. त्यावरुन, सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं. सोबतचहेकृत्यकरणाऱ्या शान-ए-हिंद यांच्यावरहीटीकाकेलीजातेय. यासर्वपार्शवभूमीवर आता, शान-ए-हिंद यांनीस्वतःप्रत्युत्तरदेतभाष्यकेलंआहे.

संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे. मग यांच्या विषयी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी कशी मिळू शकते? असेम्हणत आज होणाऱ्या आंदोलनालाही शान-ए-हिंद यांनीटीकाकेलीआहे. मी एक ओबीसी वर्गातून आलेली आहे म्हणून मला टार्गेट केले जात असल्याचा 'शान ए हिंद ' यांनी आरोप केलाय.

Shaan E Hind on Tipu Sultan दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फोटो लावणार

मालेगाव महानगरपालिकेतील वादग्रस्त छायाचित्र प्रकरणावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी एका स्वागत समारंभात केले. या वक्तव्यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या