Mahesh Shinde सातारा : साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सभेचं निमंत्रण मला मिळालं नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणार नाही. असंस्पष्टीकरण कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनीदिलंआहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतायत. कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही. असाथेटआरोपदेखील आमदार महेश शिंदे यांनीकेलाआहे. कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो. हेसांगायलादेखील महेश शिंदे विसरलेनाहीत. परिणामीआता साताऱ्यातील अंतर्गत नाराजी अधिकउफाळणारअसल्याचेचिन्हआहे. तरदुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या कार्यक्रमात महेश शिंदे व्यासपीठावर दिसणार का? ते कार्यक्रमात हजेरी लावणार का? की साताऱ्यातील अंतर्गत नाराजी आणखी तीव्र होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics news)
Satara Politics : साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार, महेश शिंदे व्यासपीठावर दिसणार का?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सातारा दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज अंगापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडेल आणि नंतर साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावरून ते शिवसैनिक आणि सातारकरांना संबोधित करणार आहेत. मात्र या दौऱ्यापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सत्कार समारंभाला आणि जाहीर सभेला उपस्थित राहणार का? असाप्रश्नपडण्यामागीलकारणम्हणजेआमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अशातच, शिवसेनेतील नेत्यांनी त्यांना कार्यक्रमासाठी बोलावल्याचे सांगितले जात असले, तरी ते येणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. गेल्या काही दिवसांपासून महेश शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा वाढल्याच्या चर्चाही सुरू आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात महेश शिंदे व्यासपीठावर दिसणार का? ते हजेरी लावणार का? की साताऱ्यातील अंतर्गत नाराजी आणखी तीव्र होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र याचे उत्तर आता काही तासांत स्पष्ट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
