Mahebub Shaikh :पुणे महानगर पालिकेत (PMC) स्थापत्य अभियंता पदासाठी आयबीपीएस (IBPS) या कंपनीने परीक्षा घेतली. या परीक्षेतील पेपर सोडवतानाचा एक फोटो व्हायरल झाला. पालिकेने या परीक्षेत (PMC) पेपरफुटी झाल्याच मान्य केल. परंतु त्यांच म्हणणं असं आहे की केवळ 3 लोकांना पेपर मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द करून आम्ही बाकी लोकांना नियुक्त्या देत आहोत. एमपीएससी परीक्षेत 1 मुलीला पेपर मिळाला तरी संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आणि इथे 3 लोकांना पेपर मिळून सुद्धा काहीच कारवाई होतं नाही, हे कसं काय चालेल? यांनी नियुक्त्या दिल्या तर कोर्टात देखील कोण जाऊ शकणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे. (Mahebub Shaikh on MPSC FDA Paper Leak)

Continues below advertisement

एमएमआरडीएने कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना महापालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत 7.30 मार्क मिळाले आहेत आणि एमएमआरडीएने घेतलेल्या परीक्षेत 200 पैकी 200. आता एवढा मोठा फरक कसा काय होऊ शकतो? याची चौकशी तत्काळ केली पाहिजे. असेही मेहबूब शेख म्हणालेत. (Mehboob Shaikh on Paper Leak)

Mahebub Shaikh : एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव याना तत्काळ निलंबित केल पाहिजे

Continues below advertisement

एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. अध्यक्ष आणि सचिव आमदार अभिमन्यू पवार आणि सुनील गाढवे नावाची व्यक्ती अशी घोटाळ्याची लिंक आहे. गाढवे यांची पत्नी पायल लांडे एफडीएची केमिकल एनालिसीस परीक्षेत तिचा रँक 10 हजार 200 होता. त्यापेक्षा अवघड ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेत थेट 31 वा रँक आला. ऋतुजा पाटील हिची फार्मासिस्ट ग्रुप C परीक्षेत 21 हजार 222 रँक होता आणि ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेत 7 वा रँक होता. आता एवढा मोठा फरक दिसत असेल तर कारवाई का करायला नको? किमान चौकशी तरी का व्हायला नको, याचं सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे. (Mehboob Shaikh on Paper Leak)

इतर महत्वाच्या बातम्या

MPSC FDA Paper Leak: तीन महिन्यांपूर्वीं परीक्षेत 21, 222 वा नंबर अन् FDA च्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान, 'त्या' तीन विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये चक्रावणारा बदल, मेहबुब शेख यांचा गंभीर आरोप