एक्स्प्लोर

Mahayuti Manifesto BMC Election 2026: 24 तास पाणी, बेस्ट बसमध्ये सवलत, पार्किंग, महापौर निधी; फडणवीस-शिंदेंच्या मुंबईकरांसाठी 87 मोठ्या घोषणा

Mahayuti Manifesto BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने वचननामा जाहीर केला आहे.

Mahayuti Manifesto BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर आज महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर (Mahayuti Manifesto) करण्यात आला. महायुतीच्या या वचननाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेस्ट प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत, तर लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

मुंबईकरांसाठी महायुतीच्या 87 मोठ्या घोषणा- (BJP-Shivsena Manifesto BMC Election 2026)

  1. ९ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण
  2. काँक्रिटी रस्त्यांचे खोदकाम टाळण्यासाठी डक्ट बसवणार
  3. प्रायवेट ले आऊटच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणार
  4. रस्ते खोदावे लागणाऱ्या १७ सेवांसाठी युटिलिटी टनेल उभारणार
  5. रस्त्यांसंबंधीच्या सूचना डिजीटल फलकाद्वारे देणार
  6. सर्व फुटपाथ स्टँप्ड काँक्रिटचे करणार
  7. पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करणार
  8. रस्त्यांवरच्या पार्किंगसाठी कम्युनिटी पार्किंग सुरू करणार
  9. रस्त्यांवर रिक्षा आणि दुचाकींसाठी पार्किंग सुरु करणार
  10. भुयारी आणि जमिनीवर नवे पार्किंग स्थळ उभारणार
  11. सर्व मोकळ्या जागांची देखभाल महापालिकेकडूनच करणार
  12. संपूर्ण मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणार
  13. मुंबईचा पाणीपुरवठा ३८०० एमएलडी वरुन ४७०० एमएलडीवर नेणार
  14. पुढील पाच वर्षे पाणीपट्टी स्थिर, वर्षाला ८ टक्क्यांची पाणीवाढ स्थगित
  15. मुंबईचे सर्व रस्ते कचरामुक्त करणार
  16. झोपडपट्य्यांतील कचऱ्यांसाठी छोट्या गाड्या पुरवणार
  17. मागेल त्याला शौचालय धोरण राबवणार
  18. कामगार भरती करुन सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार
  19. झिरो वेस्ट वॉर्ड विकसित करणार
  20. निर्माणाधीन सांडपाणी प्रक्रल्प वेळेत पूर्ण करणार
  21. सांडपाणी वाहिन्या आधुनिक करणार
  22. हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरणीय धोरण
  23. १७ हजार कोटी रुपयांची पर्यावरण संवर्धन योजना राबवणार
  24. जपानी तंत्रज्ञान वापरुन मुंबईला पाच वर्षात पूरमुक्त करणार
  25. पूर रोखण्यासाठी ४ नवीन भूमिगत फ्लडवॉटर टाक्या उभारणार
  26. हवेचा दर्जा तपासणाऱ्या स्टेशनांची संख्या दुप्पट करणार
  27. आयआयटी आणि व्हीजेटीआय (VJTI) च्या मदतीने 'सी व्ह्युईंग डेक' बनवणार
  28. संपूर्ण शहरात झाडे आणि ग्रीन झोनची संख्या वाढवणार
  29. दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका शाळांचे स्तर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत उंचावणार
  30. महानगरपालिकेच्या सर्व शाळामध्ये AI लॅब्स तयार करणार.
  31. मनपाच्या रुग्णालयांचा दर्जा एम्स (AIIMS) च्या धर्तीवर सुधारणार
  32. प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये डायलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभे करणार
  33. ६० वर्षांवरील नागरिकांना वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी
  34. 'मुंबईकर हेल्थ कार्ड' निर्माण करुन प्रत्येक मुंबईकराचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करणार
  35. प्रत्येक वॉर्डात ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत देणारी केंद्रे उभारणार
  36. मधुमेह,रक्तदाब, कर्करोगाची मोफत तपासणी करणारे फिरते दवाखाने सुरु करणार
  37. पालिकेच्या रुग्णालयांबाहेर 24 तास चालणारी स्वस्त दरातली जेनेरिक औषधे देणार
  38. केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांना संलग्न परिधीय रुग्णालये उभारणार
  39. सर्विकल आणि ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करणार
  40. टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर मनपाचे कॅन्सर रुग्णालय उभारणार, केमोथेरपी आणि रेडिएशन मोफत देणार
  41. मुंबई मधुमेहमुक्त करणार 
  42. हृदयरुग्णांसाठी खास हॉस्पिटल, सवलतीच्या दरात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी करणार
  43. कॅन्सर रुग्णांसाठी नायर रुग्णालयात १० मजली रुग्णालय उभारणे सुरू, ते अत्याधुनिक व्यवस्थांनी युक्त असेल, सुपर स्पेशालिटी सेंटरही उभारणार
  44. मुंबईत वैद्यकीय शिक्षण क्षमता दुप्पट करणार 
  45. प्रत्येक मोठ्या BMC रुग्णालयात नवीन वैद्यकीय कॉलेज/PG इन्स्टिट्यूट उभारणार
  46. Med Tech च्या धर्तीवर प्रशिक्षण देणारे हॉस्पिटल्स वाढवणार
  47. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका व रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टर तपासणी 
  48. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी उभारणार, ५० हजारांपर्यंतची मदत करणार
  49. मुंबईतील सर्व भाजी मंडई यांचे नूतनीकरण व पुनर्विकास करणार
  50. बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
  51. संपूर्ण मुंबईमध्ये LUX सर्वे करणार
  52. गोराई/मनोरी गावांचा विकास आराखडा तयार करणार
  53. झोपु योजनेत सध्या १७ प्रकल्पांचा समावेश, संख्या अजून वाढवणार
  54. प्रकल्प बाधितांसाठी घरे उपलब्ध करून देणार
  55. २० हजार इमारतींचे रखडलेले भोगवटा प्रमाणपत्र (OC) तात्काळ देणार
  56. सफाई कामगारांना हक्काची घरे देणार
  57. शासकीय,निमशासकीय, मनपा कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवणार
  58. बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणार
  59. बेस्टच्या ताफ्यात २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक राहतील
  60. बेस्ट बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांवर नेणार
  61. सर्व बस थांब्यांवर डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि वाय-फाय सुविधा देणार
  62. बेस्ट डेपोमध्ये वाचनालये उभारणार
  63. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल ५ मिनिटांत पोहचेल अशी व्यवस्था उभारणार
  64. उंच इमारतींच्या आगीच्या सर्वेक्षण,बचावासाठी थर्मल कॅमेऱ्यांचे 'फायर सर्व्हिलन्स ड्रोन्स'चा वापरणार
  65. सर्व गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना 'डिजिटल फायर ऑडिट' सक्तीचे करणार
  66. प्रत्येक प्रशासकीय वॉर्डात जागतिक दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स व स्विमिंग पूल बांधणार
  67. ३ विभागांत स्टार्ट अप, इन्नोवेशन हब उभारण्यासाठी १०० कोटी देणार
  68. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी प्रत्येक वॉर्डात वातानुकूलित, वाय-फाय सज्ज आणि चोवीस तास सुरू राहणाऱ्या अभ्यासिका उभारणार
  69. लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार
  70. महिला बचत गटांच्या वस्तू विकण्याकरिता ई-मार्केट स्थापन करणार
  71. कामकरी महिलांसाठी प्रत्येक वॉर्डात परवडणाऱ्या दरांतली पाळणाघरे उभारणार
  72. मुंबईत महिलांसाठी मुबलक शौचालय बांधणार
  73. महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज 
  74. 'मुंबई डिजिटल सखी' अंतर्गत महिलांना एआय, कोडिंग आणि ऑनलाइन मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण
  75. महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'रात्रीचे गस्त पथक' आणि त्वरित मदतीसाठी वन-टॅप मोबाईल अॅप बनवणार
  76. सार्वजनिक ठिकाणांवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, पार्क आणि हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षा वाढवणार
  77. मुंबई रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशी मुक्त करणार
  78. मराठी भाषेच्या संवर्धन,प्रसारासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापणार
  79. प्रत्येक विभागात मराठी नाटक, लोककला आणि साहित्यासाठी सुसज्ज 'मराठी कला केंद्र' आणि अभ्यासिका
  80. फक्त मराठी चित्रपटांकरीता खास मराठी मल्टिप्लेक्स उभारणार
  81. मराठी कलाकारांच्या संस्थांना महापालिकेतर्फे पाठबळ देणार
  82. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम राबवणार
  83. मराठी तरुणांसाठी शिक्षण-रोजगार-उद्योजक यांच्याकरिता धोरण राबवण्यात येईल
  84. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणार
  85. मराठी तरुणांसाठी मुंबई Fellowship सुरू करणार
  86. परवडणाऱ्या घरांचे धोरण राबवून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखणार
  87. ईस्टर्न फ्री वे घाटकोपरच्या पुढे ठाण्यापर्यंत नेणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीबाबत पवारांकडून विचारणा, सूत्रांची माहिती
शरद पवारांनी भेटीत विचारलं राजकारणात काय सुरु आहे? प्रफुल पटेल माध्यमांसोबत बोलताना म्हणाले...
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Hasan Mushrif PMLA Case Closed : 'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला
'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget