एक्स्प्लोर

Gondia News : गोंदियात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; बच्चू कडूंसमोर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी वाचला तक्रारींचा पाढा; भर मंचावर भाजपला निर्वाणीचा इशारा

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. गोंदिया जिल्हाप्रमुख सोनू कुथे यांनी

Gondia Politics : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. गोंदिया जिल्हाप्रमुख सोनू कुथे (Sonu Kuthe) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप करत वाभाडे काढले आहे. महायुतीमध्ये एकत्र असूनही भाजप (BJP) कशा पद्धतीने गोंदिया (Gondia) जिल्ह्यात शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, याचा कुथे यांनी जाहीर मंचावरून पाढाच वाचला. "गोंदिया नगरपरिषदेत भाजपचे नगराध्यक्ष होते. आम्ही तिथे भाजपच्या नगराध्यक्षाचा पत्ता कट करून दाखवला. आम्ही साडेबारा हजार मते काढून दाखवली. भाजपकडून दुजाभाव आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप करत कुथे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून भाजपला थेट आव्हान दिले.
 
दरम्या, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हे आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण साहेब मी आपल्याला शब्द देतो, आमच्याकडे दोन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी आहे. आगामी काळात यांच्या टांगा पलटी केल्याशिवाय आणि यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा निर्धार देखील गोंदिया जिल्हा प्रमुख शिवसेना सोनु कुथे यांनी बोलून दाखवलाय.

Sonu Kuthe : आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांचे बारा वाजवून दाखवू..

जर त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हा परिषदेत आम्ही त्यांचे बारा वाजवून दाखवू..." अशा शब्दात सोनु कुथे यांनी मित्र पक्षाला सज्जड दम दिला आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी भाजपविरोधात उगारलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.

Narendra Bhondekar : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी डण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत, "एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार," असा निर्धार व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात शिवसेना, प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होता. यावेळी शिवसेना नेते आमदार बच्चू कडू त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार भोंडेकरांनी हा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, आमदार भोंडेकर एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे. "आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर, आम्ही 11 झालो आहोत," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधला. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी किमान 30 जागा जिंकून आणायच्या आहेत. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि तो आमचा अधिकार आहे. आमचं एकच स्वप्न आणि एकच संकल्प आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं!" असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget