Mahayuti Government: आदिती तटकरेंचा विभाग अव्वल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी नंबर 1, उल्हासनगरचे आयुक्त पहिल्या क्रमांकावर, सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!
Mahayuti Government: 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. 100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. 100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपचे तीन विभाग टाॅप पाचमध्ये आहेत. पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघाडीवर आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
फडणवीसांची सोशल मिडिया पोस्ट
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
#महाराष्ट्रदिन #Maharashtra
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर
आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम आहे. आदिती तटकरेंच्या खात्याला 80 टक्के गुण मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकावरती आहे, माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभाग 66.15 टक्के गुण मिळाले आहेत. ग्रामविकास विभाग चौथ्या तर परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानी आहे.
सरकारच्या 100 दिवसांत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम
चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29 टक्के गुण
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीय
जळगावचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी
अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण
नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,66.86 टक्के गुण
पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम
100 दिवसांच्या कामांत पालघर पो.अधीक्षकांना 90.29% गुण
नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पो.अधीक्षक द्वितीय स्थानी
नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीच्या पो.अधीक्षकांना 80 टक्के गुण
जळगावचे पो.अधीक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 64 टक्के गुणांसह पाचवे
ढिसाळ कामगिरी करणारे तीन विभाग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असणारा अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहे. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नगरविकास विभागाला 34 टक्के मार्क, तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहे.

























