एक्स्प्लोर

Mahavikas Aghadi On Rajya Sabha And Vidhan Parishad Election 2026: राज्यसभा, विधान परिषदेवरून मविआत संघर्षाची ठिणगी; उमेदवार ठरवण्यावरून मतमतांतरं, नेमकं काय घडतंय?

Mahavikas Aghadi On Rajya Sabha And Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस दुसरी भूमिका मांडत आहे.

Mahavikas Aghadi On Rajya Sabha And Vidhan Parishad Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एकेक जागाच संख्याबळानुसार येत आहे. मात्र या एकेक जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. मविआत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय. मात्र  शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती आहे. 

विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं, यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस दुसरी भूमिका मांडत आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय. त्यामुळे मात्र महाविकास आघाडीकडून राज्यसभेला कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार द्यायचा आणि विधान परिषदेसाठी कोण उमेदवार द्यायचा यासाठी एकत्रित बैठक होण्याआधी पक्षांतर्गत मतमतांतर पाहायला मिळताय. त्यामुळे यावर तोडगा कसा काढला जातो? हे मोठा आव्हान तीन पक्ष समोर असणार आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षांतर्गत चर्चा काय आहे? (Mahavikas Aghadi Rajya Sabha Election 2026)

महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्याबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर दावा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, असं मत नेत्यांनी मांडलं. मात्र राज्यसभेसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती आहे.  तर विधान परिषदेसाठी ठाकरेंची सेना आपल्या पक्षाचा उमेदवार देईल. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी घ्यावी अशी पक्षातील इच्छा आहे.

राज्यसभा विधान परिषदेसाठी एक एक उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि नेत्यांचे नेमकं म्हणणं काय आहे?

1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली आधी भूमिका स्पष्ट करावी- 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राज्यसभेची महाविकास आघाडीकडून उमेदवारी शरद पवार यांना देण्याऐवजी काँग्रेसने स्वतः घ्यावी. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यास त्याचा फटका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपली भूमिका आधी स्पष्ट करावी असे मत काँग्रेसकडून मांडण्यात आलं आहे.

2. विधान परिषद किंवा राज्यसभा दोन्हीपैकी एका जागेवर काँग्रेसने दावा करावा- 

ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणण्यानुसार राज्यसभा जागेसाठी शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा हे काँग्रेसला मान्य नाही कारण काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये 16 आमदारांचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक एक जागा घेत असतील तर मग काँग्रेसच्या हाताला काय येणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे...त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद एका जागेवर काँग्रेस दावा करणार हे जवळपास काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत निश्चित झाला आहे.

3. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवून राज्यसभेसाठी काँग्रेसने उमेदवार द्यावा आणि विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार द्यावा- 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका तळ्यात मळ्यात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेस आणि ठाकरेंचे शिवसेनेने एकत्रित येऊन काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवार द्यावा आणि विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार द्यावा, कारण दोन्ही पक्षांचे संख्यावर बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवून सुद्धा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो असेही मत काँग्रेस नेत्यांकडून मांडण्यात येतंय.

10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर- (Rajya Sabha Election 2026)

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार- (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. (Rajyasabha Election 2026)

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Embed widget