एक्स्प्लोर

Mahavikas Aghadi Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, आता राज्यसभा, विधान परिषदेसाठी समीकरण काय?, A टू Z माहिती

Mahavikas Aghadi Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात आली अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.

Mahavikas Aghadi Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात आली अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. एकीकडे काँग्रेसने स्वबळावरती तयारी करा असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेत तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीने महायुती सोबत घरोबा केलाय. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांच्या शिवसेनेने ही काही ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) संपुष्टात आलं असं बोलल जात आहे. मात्र दुसरीकडे आगामी काही दिवसात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. विधान परिषदेच्या ही अनेक जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही, तर एकही खासदार राज्यसभेवरती जाऊ शकणार नाही. विधान परिषदेतही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी तरी महाविकास आघाडी एकत्र येणार की महायुतीला फायदा होणार? काय आहे या निवडणुकीचे समिकरण, याबाबत जाणून घ्या... (Mahavikas Aghadi Maharashtra Politics)

काय आहे राज्यसभेच गणित? (Rajyasabha)

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण 7 जागा 2 एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणार आहेत. 

कोणत्या जागा रिक्त होणार आहेत? 

  1. शरद पवार, राष्ट्रवादी, (एसपी) 
  2. रामदास आठवले ( भाजपच्या कोट्यातून आरपीआय आठवले गट)
  3. भागवत कराड, भाजप
  4. धैर्यशील पाटील, भाजप
  5. प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना (युबीटी)
  6. रजनी पाटील, काँग्रेस
  7. फौजीया खान, राष्ट्रवादी (एसपी)

या सात जागांमध्ये भाजपच्या 3, राष्ट्रवादी (एसपी)२, काँग्रेस 1 आणि शिवसेना (युबीटी) 1 रिक्त होत आहे. सध्या विधानसभेमध्ये 286 आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या पहिल्या पसंतीचा क्रम पाहिला तर साधारणतः 37 चा कोठा ठरू शकतो. महायुतीकडे विधानसभेत 235 च्या आसपास संख्याबळ आहे. त्यामुळे 6 खासदार राज्यसभेवर जाऊ शकतात. मात्र महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे 37 सदस्यांचा एकगठ्ठा आमदार नाहीत. दोन पक्ष मिळूनही एक खासदार ही निवडून आणू शकत नाही त्यामुळे तीनही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मतांची फोडाफोडी  करून महायुती  सातवा ही उमेदवारसाठी प्रयत्न करु शकते. हाच प्रश्न विधान परिषदेत ही पाहायला मिळत आहे.

काय आहे विधान परिषदेत गणित? (Vidhan Parishad)

विधान परिषदेत एकुण 78 सदस्य संख्या आहे. त्यापैकी 55 सदस्य सध्या आहेत तर 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 14 मे 2026  ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत. या 9 ही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, अमोल मिटकरी , शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत 13 मे रोजी संपत आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार आहेत त्यामुळे 36 आमदारांच्या मतदानाचा कोठा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे सहा सदस्य सहज निवडून येऊ शकतात तर सातव्या सदस्यांसाठी महायुतीत प्रयत्न करावे लागतील. तर महाविकास आघाडीत 46 आमदारांची संख्या असल्याने एक आमदार निवडून येऊ शकतो तर दुसऱ्या आमदाराला निवडणून आणण्यासाठी अपक्ष आणि इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. त्यात ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली तर कटू कट एक आमदार होऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेचा एक सदस्य आणि विधान परिषदेचा एक सदस्य महाविकास आघाडीसाठी त्यांच्या आघाडीवरती अवलंबून असणार आहे. नाहीतर महायुतीचा सर्व ठिकाणी विजय होऊ शकतो, हे ही तेवढच खरं...

विधान परिषदेची काय आहे सध्यस्थिती- (Maharashtra Vidhan Parishad)

विधान परिषदेत एकुण 78 सदस्य आहेत. त्यापैकी 55 सदस्य सध्या आहेत तर 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 14 मे 2026 ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत. राज्यपाल नियुक्त- 5 जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था- 17 जागा रिक्त...तर प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने 1 जागा रिक्त.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget