Jalandar Patil Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांना कोल्हापुरात मोठा दणका बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील हे महायुतीच्या व्यासपीठावर आले आहेत. जालंदर पाटील (Jalandar Patil) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक म्हणून जालंदर पाटील यांची ओळख होती.शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय मान्य नसल्यानं जालंदर पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 


दरम्यान, भाजपचे नेते सत्यजित कदम यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनकरण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेसच कोल्हापुरातील उमेदवारांसह प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, जालंदर पाटील हे राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते समजले जात होते. मात्र, अखेर त्यांनी देखील राजू शेट्टींची साथ सोडली आहे. त्यामुळं कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.