Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरीकडे अजितदादांच्या अपघातावर घातपाताचा संशय; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 26 Feb 2026 07:25 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: महाराष्ट्राचे 2026 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनात 18000...More

Mumbai News: ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

Mumbai News: ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होणार असून दक्षिण मुंबईतील पूर्व–पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार आहे.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हा 333 मीटर लांबीचा पूल ताडदेव आणि नागपाडा परिसराला थेट जोडतो. पुलामुळे बेलासिस रोड, ग्रँट रोड, पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.मुंबई सेंट्रलजवळील 130 वर्ष जुना पूल पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हा मार्ग बंद होता. नव्या उड्डाणपुलामुळे पूर्व–पश्चिम वाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग पुन्हा उपलब्ध होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.