मुंबई : राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 12 जागा, शिवसेनेला 3 जागा तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा मिळणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. तर 22 जून रोजी त्याचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे.

भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा

स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावर महायुतीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली आहे. सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधानपरिषद जागेवर दावा सांगण्यात येत आहे. या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12, तर शिवसेनेच्या वाट्याला 3 व राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

याच फॉर्म्युल्याच्या आधारे महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा चर्चा होणार आहे. काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

प्राथमिक चर्चेनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला -

  • भाजप 12
  • शिवसेना 3
  • राष्ट्रवादी 2

कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?

राष्ट्रवादी काँग्रेस - रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग, हिंगोली - परभणी

शिवसेना - ठाणे, नाशिक, यवतमाळ,

भाजप -  नागपूर, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर - जालना, सातारा - सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा - गोंदिया, अमरावती, लातूर - धाराशीव - बीड, सोलापूर

ही बातमी वाचा: