Vidhan Parishad Election 2026: राज्यातील 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला गेलाय. तर आता 11 ठिकाणी विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगतानाचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी नेमकं कुणाचं पारडं जड असेल हे निकाला अंती कळणार आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुका (Vidhan Parishad Election 2026) होत असताना अनेकांच्या मनात पहिली, दुसरी आणि तिसरी पसंतीच्या मतांचे गणित नेमके कसे असते? असा प्रश्न निर्माण होतो. या निवडणुकीत मतदानाची पद्धत सर्वसाधारण निवडणुकांपेक्षा वेगळी असून प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने मतदान घेतले जाते. परभणीतील निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांसमोर पसंतीक्रम द्यावा लागतो आणि सर्वाधिक पसंती मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. अशातच हे मतदान नेमकं कसं होतं? स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर प्रतिनिधी कसा निवडला जातो? नेमकी कशी असते मतदानाची प्रक्रिया, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पसंतीच्या मताचे काय असते गणित? उमेदवाराला विजयासाठी किती मतांचा कोटा लागतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ. (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

Continues below advertisement

मतदार कोण? कसंहोतं मतदान? (Vidhan Parishad Election 2026)

मतदार म्हणजेनिवडून आलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर 1 हा आकडा लिहितात. त्यानंतर इच्छेनुसार दुसऱ्या पसंतीसाठी 2, तिसऱ्या पसंतीसाठी 3, अशा क्रमाने पसंतीक्रम नोंदवता येतो. पहिली पसंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एखाद्या उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा पहिल्याच फेरीत मिळाला तर तो थेट विजयी घोषित होतो.

Continues below advertisement

पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध- (Vidhan Parishad Election 2026)

राज्याच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय राजकीय 'मास्टरस्ट्रोक' लगावला आहे. या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हा विजय म्हणजे आगामी उर्वरित जागांसाठी महायुतीला मिळालेले मोठे 'बूस्टर डोस' मानले जात आहे.

कुठे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी?

  1. ठाणे - रवींद्र फाटक - शिवसेना
  2. यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी - शिवसेना
  3. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस
  4. पुणे - विक्रम काकडे - राष्ट्रवादी काँग्रेस
  5. वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर - अरुण लखाणी - भाजप
  6. अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे - भाजप

राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण?

1. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) 

2. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

3. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )

विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

4. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस) 

5. नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

6. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)  विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

7. नाशिक :  गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध  नरेंद्र दराडे  (शिवसेना)

8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा  (वंचित )

9. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील

देशमुख (अपक्ष) 

11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)  

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून