एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठकांसाठी उपमुख्यमंत्री दुपारी एक वाजता दिल्लीत जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्यातील विधानपरिषद जागेवरून शिंदे शिवसेनेत नाराजी असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर तर एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा नाही ना?, अशी चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे कोणाच्या भेटीघाटी घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Eknath Shinde Delhi Visit)

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या (Pune Teachers Constituencies) जागेवरून युतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंगेश चिवटेही (Mangesh Chivate) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पुण्याच्या जागेवर आजही आमचा दावा आहे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप हे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे सानप यांनी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सानप आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Maharashtra Vidhan Parishad Election 2026 Marathi News)

अर्ज भरण्यासाठी फक्त शेवटचे दोन दिवस उरले- (legislative council election 2026)

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आज भाजपसह अनेक उमेदवार अर्ज भरणार आहेत, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या जागा वाटपात भाजपने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी आपणच अधिकृत उमेदवार अशी भूमिका जाहीर केली आहे याला मंत्री उदय सामंत यांनी देखील दुजोरा दिला आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीत 5 पैकी 3 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत या 3 पैकी अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर संभाजीनगर पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे या जागांवर आजच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत कोणीकोणी उमेदवार जाहीर केले, संपूर्ण यादी- (Maharashtra Vidhan Parishad Election Candidate List)

जागा- पुणे पदवीधर- 

  • भाजप- डॉ. स्मिता जाधव (अधिकृत उमेदवार)
  • राष्ट्रवादी-सुनील टिंगरे (इच्छुक)
  • राष्ट्रवादी श.प. भैया माने (इच्छुक)

जागा-पुणे शिक्षक- 

  • भाजप- कौस्तुभ गावडे (अधिकृत उमेदवार)
  • शिवसेना- मंगेश चिवटे (इच्छुक)
  • काँग्रेस- जयंत आसगावकर (अधिकृत उमेदवार)

जागा- नागपूर पदवीधर- 

  • भाजप- सुधाकर कोहळे (अधिकृत उमेदवार)
  • भाजप-अनिल सोले (इच्छुक)
  • काँग्रेस-अभिजीत वंजारी (अधिकृत उमेदवार)

जागा- अमरावती शिक्षक- 

  • काँग्रेस-अदिती पोहरे (अधिकृत उमेदवार)
  • शिवसेना ठाकरे गट- दत्तात्रय लहाने (अधिकृत उमेदवार)
  • शिवसेना- किरण सरनाईक (इच्छुक)
  • शिवसेना- श्रीकांत देशपांडे (इच्छुक)
  • भाजप संगीता शिंदे (इच्छुक)
  • भाजप- शेखर भोयक (इच्छुक)

जागा-छत्रपती संभाजीनगर पदवीधर-

  • मराठवाडा शिक्षक संघ- सुशील घोटे-पाटील (अधिकृत उमेदवार)
  • राष्ट्रवादी- सतिश चव्हाण (अधिकृत उमेदवार)
  • राष्ट्रवादी श.प.-प्रतापसिंह पाटील (इच्छुक)
  • शिवसेना ठाकरे गट-दिलीप घुगे (इच्छुक)

23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान- (Vidhan Parishad Election 2026)

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी त्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Election Candidate List: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गटापासून काँग्रेसपर्यंत...; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Embed widget